‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’ पूजा बेदीचा मिलिंद सोमणला पाठिंबा

pooja bedi
pooja bedi

मुंबई- गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अश्लिल व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री पूजा बेदी हिने तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

पूजा बेदीने मिलिंद सोमणची बाजू घेत “जर नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक का करत नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे. “मिलिंदच्या फोटोमध्ये काहीही अश्लिल नाही. तो फोटो पाहून कल्पना करणाऱ्यांच्या डोक्यात अश्लिलता भरली आहे. त्याचा अपराध चांगलं दिसण, प्रसिद्ध होणं आणि बेंचमार्क प्रस्थापित करणं आहे. जर नग्नता हा अपराध असेल तर नागा साधूंना देखील अटक करा. ते केवळ शरीरावर राख लावतात म्हणून त्यांच्या नग्नतेचा तुम्ही स्विकार करु शकत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन पूजाने मिलिंद सोमणला पाठिंबा दिला आहे. 

पूजाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचच लक्ष वेधून घेतंय. ‘मिलिंद सोमणने सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीये. ४ नोव्हेंबर रोजी आपल्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

यापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याविरोधात अश्लिल व्हिडीओचं चित्रीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना ताब्यात घेतलं होतं.  

pooja bedi supports milind somans compares the image with bare naga sadhus  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com