बॉलीवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला दारूमुक्त होण्याचा अनुभव

pooja bhatt
pooja bhatt
Updated on

मुंबई-  ९०च्या दशकातील प्रसिद्ध  अभिनेत्री पूजा भट्ट सध्या बॉलीवूडमध्ये तितकी ऍक्टीव्ह नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती ब-याचदा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मिडियावरुन तिचे अपडेट देत अलते. देशभरात घडणाऱ्या चालु घडामोडींवर ती अनेकदा तिचं मत परखडपणे मांडताना दिसते. मध्यंतरी 'सडक २' सिनेमाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर या सिनेमाच्या टीमला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. इतंकच नाही तर कंगनाने महेश भट्ट यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे देखील तिने ट्विट करत कंगनाला सुनावल्याने ते चर्चेत होती.  मात्र यावेळी पुजा भट्ट कुठल्याही वादग्रस्त वक्तव्यांमुळे नाही तर चक्क व्यसन सोडल्यामुळे चर्चेत आहे. 

बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रिटींनी दारु, ड्रग्सचं व्यसन असल्याचं जगजाहीर केलं होतं. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री पूजा भट्ट. पूजा भट्टने तिच्या जीवनशैलीत बदल करत मद्यपानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी सांगताना पूजा म्हणजे, “होय, आयुष्य बदलवून टाकणाऱ्या त्या निर्णयाला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. यापूर्वी गुलाबी शॅम्पेन, माल्ट आणि शहरातील गर्दी होती. आज तोच गुलाबी रंग मला आकाशात दिसतोय. शहरापासून दूर एकांतात आयुष्याचा आनंद घेतेय. हा मला समृद्ध करणारा प्रवास होता.” असं ट्विट करुन पूजाने मद्यपान सोडल्याचं स्पष्ट केलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.

काही तासांतच शेकडो यूजर्सनी तिच्या या निर्णयाचं कौतुक देखील केलं आहे. बॉलीवूडमध्येएकीकडे ड्रग्सचं प्रकरण ताजं असतानाच पूजाने घेतलेल्या या निर्णयाची स्तुती होतेय. 

pooja bhatt celebrates 4 years of sobriety says its been a searing journey  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com