“बिग बॉस पुन्हा सुरु करताय का?” सततच्या रिएंट्रीमुळे माजी स्पर्धकांनी उडवली बिग बॉसची खिल्ली

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 24 December 2020

'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकांनी देखील या शोच्या नव्या नियमांची खिल्ली उडवली आहे. या शोमध्ये मागच्या सिझनसारखी मजा येत नसल्याचं देखील अनेकांनी म्हटलं आहे. 

मुंबई-  बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त पण लोकप्रिय असलेला असा रिऍलिटी शो आहे. हा शो सुरु होऊन आता दोन महिने उलटून गेले आहेत. हा शो आता फिनालेच्या दिशेने जात असताना शोमध्ये मात्र एकानंतर एक एंट्री होताना दिसतेय.  'बिग बॉस १४' च्या या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्रीचा प्रकार काही अद्याप थांबलेला नाही. गेल्या काही दिवसात जवळपास सहा नवे स्पर्धक या शोमध्ये आले आहेत. हा प्रकार पाहून प्रेक्षकांचा चांगलाच गोंधळात उडाला आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकांनी देखील या शोच्या नव्या नियमांची खिल्ली उडवली आहे. या शोमध्ये मागच्या सिझनसारखी मजा येत नसल्याचं देखील अनेकांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने डान्सबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय    

'बिग बॉस'मध्ये नेमकं काय घडतंय? शो संपवताय की पुन्हा एकदा सुरु करताय?” अशा आशयाचे ट्विट्स करुन काम्या पंजाबी, देवोलिना भट्टाचार्जी, विशाल सिंह या माजी स्पर्धकांनी बिग बॉसची खिल्ली उडवली आहे. त्यांचे ही ट्विट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहेत.

अभिनेत्री शमिता शेट्टी मध्यंतरी 'बिग बॉस'विविषयी ट्विट करत चर्चेत आली होती. शमिता देखील बिग बॉसची माजी स्पर्धक आहे. मात्र तिने या शोवर टीका केली होती. ती म्हणाली, “बिग बॉस हा अत्यंत त्रासदायक शो आहे. मी तीसऱ्या सिझनमध्ये या शोची स्पर्धक होते त्यामुळे एलिमिनेट झाल्यावर शोचे एक-दोन एपिसोड पाहिले. आणि तेव्हाच ठरवलं यापुढे हा शो पाहायचा नाही. यामध्ये केवळ भांडणं, मारामारी, राजकारण आणि अश्लिल भाषेत केलेलं संभाषण पाहायला मिळतं. अशा प्रकारच्या शोमधून मनोरंजन होत नाही तर केवळ मानसिक त्रास होतो. त्यामुळे अशा शोपासून मी कायमच दूर राहण्याचा प्रयत्न करते.” बिग बॉसमध्ये सध्या अर्शी खान आणि  विकास गुप्ता यांच्यात जोरदार घमासान होतंय.

tired of the re entry in bigg boss 14 these television stars did tweet 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tired of the re entry in bigg boss 14 these television stars did tweet