esakal | अभिनेत्री पुजा हेगडेला कोरोना, सोशल मीडियावर पोस्ट

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री पुजा हेगडेला कोरोना, सोशल मीडियावर पोस्ट
अभिनेत्री पुजा हेगडेला कोरोना, सोशल मीडियावर पोस्ट
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री पुजा हेगडेला कोरोनाची लागण झाली आहे. पुजाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली.

पुजाने पोस्टमध्ये सांगितले, ‘ हॅलो, तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छीते की माझी कोरोना टेस्ट पॉजिटिव आली आहे. मी सर्वांना विनंती करते की, जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी देखील टेस्ट करून घ्यावी. प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. मी बरी होण्याचा प्रयत्न करत आहे. घरी राहा सुरक्षीत राहा आणि स्वत;कडे लक्ष द्या‘. पुजाने स्वत;ला आयसोलेट केले आहे.नील नितिन मुकेश, सोनू सूद, मनीष मल्होत्रा, अक्षय कुमार, गोविंदा, परेश रावल, आलिया भट्ट, रणबीर कपूर या बॉलिवूडमधील कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.

लवकरच पुजा सर्कस, आचार्य आणि राधे श्‍याम या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुजाने राधे श्याम या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केली होती. पण आता तिला कोरोनाची लागण झाल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. मोहोंजो दरो, हाऊस फुल 4, रेस- 3 या हिट चित्रपटांमध्ये पुजाने काम केले आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखीस सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो शूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील पुजाने काम केले आहे. साक्षम, डिजे, मोस्ट इलिजीबल बॅचलर या चित्रपटांमधील पुजाचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.