esakal | ...म्हणून अभिनेत्री पूजा सावंत डिलीट करते सोशल मिडीयावरील निगेटिव्ह कमेंट्स

बोलून बातमी शोधा

pooja sawant}

अनेकदा सोशल मिडियावर सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. या कारणामुळे मात्र, याच सोशल मीडियाचा सध्या कलाकारांना विट आलेला आहे 

...म्हणून अभिनेत्री पूजा सावंत डिलीट करते सोशल मिडीयावरील निगेटिव्ह कमेंट्स
sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  सेलिब्रिटी सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. चालु घडामोंडींवर ते अनेकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. इतकंच नाही तर त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयीचे अपडेट्स, प्रमोशन यासारख्या गोष्टींसाठी ते याचा सर्रास वापर करतात. चाहत्यांसोबतही अनेकदा लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असतात. मात्र अनेकदा या माध्यमावर त्यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. या कारणामुळे मात्र, याच सोशल मीडियाचा सध्या कलाकारांना विट आलेला आहे 

हे ही वाचा: अनुपम खेर यांनी दिलेली अनोखी भेट पाहून कपिल झाला भावूक  

सेलिब्रिटी सोशल मिडियावर एखाद्या गोष्टीवर व्यक्तिस्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्यानुसार त्यांच परखड मत व्यक्त करत असतात. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे, काही व्हिडिओमुळे ते ट्रोलिंगचे शिकार होतात. मात्र या सततच्या ट्रोलिंगला कंटाळून बॉलीवूड तसंच मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीयाला रामराम ठोकला आहे तर काहींनी यातून लांब राहत वेगळा मार्ग शोधला आहे.

मराठी अभिनेत्री पूजा सावंतचंच उदाहरण घ्या ना. पूजा सावंतने नुकताच ती सोशल मिडीयावरील नकारात्मक कमेंट्स डिलिट करत असल्याचा खुलासा केला आहे.  ''या ट्रोलिंगचे नकारात्मक पडसादही दिसून येतात. यामुळे कलाकारांची समाजात असलेली लोकप्रिय प्रतिमा मलीन होते. विशेष म्हणजे आगामी प्रोजेक्टच्या प्रदर्शनाच्या वेळेस ट्रोलिंग झाल्यास त्याचा परिणाम थेट व्यवसायावर आणि आपल्या प्रतिमेवर होतो'' असं मत तिने व्यक्त केलं आहे.  

pooja sawant shares why she deletes negative comments from social media