पूनम पांडे विरोधात चार्जशीट दाखल; गोव्यातील 'ते' प्रकरण पडलं महाग,वाचा

बॉलीवूडमध्ये फारशी कमाल दाखवू न शकलेली पूनम पांडे नेहमीच वादांमुळे चर्चेत असते.
Poonam Pandey chargesheeted in obscenity case
Poonam Pandey chargesheeted in obscenity caseGoogle
Updated on

गोव्यात(Goa) न्यूड फोटोशूट(Nude Photoshoot) आणि व्हिडीओ शूटिंगच्या(Video Shoot) प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे(Poonam Pandey) आता कायद्याच्या कचाट्यात फसत चालल्याचं चित्र निर्माण झालं आहे. बातमी आहे की,पूनम पांडे विरोधात गोवा पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. २०२० मध्ये पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिच्यावर आरोप होता की तिनं चपोली डॅमवर अश्लील व्हिडीओचं शूटिंग करुन नियमांचं उल्लंघन केलं आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणात पूनम पांडे व्यतिरिक्त तिचा पती सॅम बॉम्बेचं नाव देखील सामिल केलं आहे.(Poonam Pandey chargesheeted in obscenity case)

Poonam Pandey chargesheeted in obscenity case
आयुषमानच्या पत्नीनं त्यांच्या 'sex life' चा केला खुलासा; अभिनेता नाराज?

पूनम पांडे आपला पती सॅम सोबत २०२० मध्ये कानकोना इथं फिरण्यास गेली होती. तिथे पूनम पांडेवर आरोप लावले आहेत की,सार्वजनिक ठिकणी अश्लील व्हिडीओ तिनं शूट केले. तसंच,डान्स देखील केला ज्यामुळे तिथे उपस्थित अन्य पर्यटकांना त्याचा त्रास झाला. एवढंच नाही, तर पूनम पांडेनं त्या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर देखील शेअर केलं होतं जो व्हिडीओ व्हायरल देखील झाला होता.

Poonam Pandey chargesheeted in obscenity case
प्रसिद्ध टी.व्ही अभिनेत्याच्या पत्नीनं केलं टक्कल; कारण ऐकून व्हाल थक्क

आपल्या माहितीसाठी इथं सांगतो की कंगना रनौतच्या 'लॉकइप' शो मध्ये दिसलेली पूनम पांडे आपला एक प्रायव्हेट अॅप चालवते,ज्यामध्ये ती न्यूज व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. या अॅपला सबस्क्राइब करायचं असेल तर त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. या अॅपसाठीच पूनम पांडे व्हिडीओ शूट करत होती असं म्हटलं जात आहे. पूनम पांडे अनेकदा टॉपलेस होण्याच्या मुद्द्यावरुन वादात पडलेली आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे प्रकरण काही नवीन नाही. पण पोलिसांनाी आरोपपत्र दाखल करुन चांगलाच दणका मात्र तिला दिला आहे. पूनम पांडेनं 'नशा' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण तिथे फारशी काही कमाल ती दाखवू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com