Poonam Pandey Controversy : पूनमचे 'ते' 5 वाद, त्यामुळे ती कायमच ट्रोल होत राहिली!

बॉलीवूड आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी पूनम पांडेच्या निधनानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
Poonam Pandey Death bollywood Actress top 5 Controversies
Poonam Pandey Death bollywood Actress top 5 Controversiesesakal
Updated on

Poonam Pandey Death bollywood Actress top 5 Controversies : बॉलीवूड आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी पूनम पांडेच्या निधनानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे.तिच्या टीमनं इंस्टावर (Poonam Pandey Latest News) व्हायरल केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांना कळले की, तिचं गर्भाशयाच्या कँसरनं निधन झाले आहे. या सगळ्यात (Cervical Cancer) पूनम आणि तिच्या भोवतीचे नेहमीच चर्चेत राहणारे वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

मनोरंजन विश्वात पूनमनं तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या (Poonam Pandey Death) सेलिब्रेटींशी पंगा घेतला होता. आपल्याला कोण काय म्हणेल यापेक्षा मी काय म्हणजे अशी भूमिका घेऊन पूनमनं तिच्या नावाचा वेगळा दरारा निर्माण केला होता. ज्या ज्या रियॅलिटी शो मध्ये पूनम (Who is Poonam Pandey) सहभागी झाली होती त्यात देखील पूनमनं मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग तयार केला. या सगळ्यात तिची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसून आले.

पूनम ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच बातमीचा विषय राहिली. सेलिब्रेटींच्या गॉसिप आणि त्यातील वाद यामध्ये पूनमचे नाव ही नित्याची गोष्ट होती. तिच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यात तिच्या नावाभोवती असणारे ते पाच वाद कायमच तिच्या बिनधास्त व्यक्तिमत्वाची साक्ष पटवून देणारे ठरले आहे.

वर्ल्ड कप २०११ (World Cup 2011)

अनेकांना पूनमचा वर्ल्ड कप २०११ च्या वेळचा वाद माहिती असेल. यावनेळी तिनं भारत जर २०११ चा वर्ल्ड कप जिंकला तर तिच्या कपड्यांविषयी वक्तव्य केलं होतं. पूनमच्या त्या वक्तव्यामुळे बीसीसीआयनं तिला चांगलेच सुनावले होते. तिला सामना पाहण्यासाठी बंदीही घातली होती.

बाथरुम व्हिडिओ (Bathroom video)

पूनम ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन वेगवेगळे फोटो व्हायरल करण्यात प्रसिद्ध होती. तिचा एक बाथरुम व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे तिला खूप ट्रोल देखील करण्यात आले होते. ती तिच्या बाथरुममध्ये डान्स करतानाचा तो व्हिडिओ होता. त्यावरुन वाद झाल्यानं युट्यूबनं तो व्हिडिओ काढून टाकला होता.

तिला जेव्हा अटक झाली होती... (When the arrest happened)

पूनम पांडेला एकदा तर अटकही करण्यात आली होती. तिला लॉकडाऊनच्या काळात तुरुंगाची हवाही खावी लागली होती. त्या वेळी लॉकडाऊन असताना ती तिचा पती सॅम सोबत फिरायला निघाली होती. यावेळी मुंबई पोलिसांनी तिला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली होती.

नवऱ्यावर केले होते आरोप...

भलेही पूनमनं लग्न केले असेल मात्र त्या लग्नानंतर तिचे खूप सारे वाद समोर आले होते. त्याचा तिला त्रास झाला होता. तिनं तिचा पती सॅम विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. पतीकडून मानसिक त्रास होत असल्याचे पूनमचे म्हणणे होते. यानंतर पोलिसांनी सॅमला अटकही केली होती.

पांडे अॅप.. (Pandey App)

२०१७ मध्ये पूनमनं एक वेगळा निर्णय घेतला होता. तिनं पांडे अॅप लाँच (Poonam Pandey launched an app) केले होते. मात्र त्यावरील बोल्ड कंटेटमुळे ते अॅप फारसे चालले नाही. त्यावरुन मोठा वाद झाला होता. गुगलनं देखील त्यांच्या प्ले स्टोअर वरुन तासाभरात ते अॅप हटवले होते. (Google from the Play Store ) अशी माहिती समोर आली होती.

Poonam Pandey Death bollywood Actress top 5 Controversies
Poonam Pandey Death : वयाच्या ३२ व्यावर्षी पुनम पांडेचं कॅन्सरने निधन, इंस्टाग्राम पोस्टवरून धक्कादायक खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com