Poonam Pandey Death : वयाच्या ३२ व्यावर्षी पुनम पांडेचं कॅन्सरने निधन, इंस्टाग्राम पोस्टवरून धक्कादायक खुलासा

Poonam Pandey Viral News पुनम पांडेचे गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन झाले आहे. तिच्या इंस्टावरील पोस्टनं चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या टीमकडून इंस्टावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टनं मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
Poonam Pandey Death
Poonam Pandey Deathesakal
Updated on

Poonam Pandey Death : टीव्ही मनोरंजन क्षेत्रात आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असणाऱी सेलिब्रेटी पुनम पांडेचं गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन (Poonam Pandey Death) झाल्याची बातमी समोर आली आहे. तिच्या इंस्टा अकाउंटवरुन आलेल्या या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हिकल कॅन्सरनं (गर्भाशयाच्या कॅन्सरनं) पुनमचे निधन (Poonam Pandey Viral News) झाले आहे. तिच्या इंस्टावरील पोस्टनं चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या टीमकडून इंस्टावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टनं मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

बोल्डनेसमुळे पूनमच्या नावाची नेहमीच मनोरंजन विश्वात चर्चा होती. तिनं गेल्या वर्षी कंगनाच्या (Poonam Pandey Latest Marathi News) लॉकअप नावाच्या रियॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यातून पुनमची लोकप्रियता वाढली होती. पूनमनं अनेकदा बॉलीवूडमधील सेलिब्रेटींशी पंगा घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

याबाबत फ्री प्रेस जर्नलनं सविस्तर वृत्त दिलं आहे. गुरुवारी रात्री पूनमचे निधन झाल्याचे (Poonam Pandey Death Due to Cervical Cancer) सांगण्यात येत आहे. कानपूर येथे असणाऱ्या पूनमच्या राहत्या घरी तिचं निधन झाले आहे. तिच्या अंत्यसंस्काराविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पूनमच्या त्या इंस्टा अकाउंटवरुन तिच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार, हे सांगणं आमच्यासाठी (Poonam Insta Post) खूपच धक्कादायक आहे. तिला सर्व्हिकल कॅन्सर झाला होता.

Poonam Pandey Death
Rahat Fateh Ali Khan Statement : भारतीय परदेशात जाऊन लग्न का करतात? पाकिस्तानी गायक राहत फतेहच्या उत्तरानं वाद!, 'त्यांना तर...

आमच्यासाठी हा मोठा संघर्षाचा काळ आहे. ज्या घटना घडल्या आहेत त्यामुळे आम्ही सर्वजण मोठ्या धक्क्यात आहोत. तिचं असं हे अकाली जाणं आपल्या सर्वांसाठी मोठं धक्कादायक असल्याचे पुनमच्या टीमच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

कोणत्या चित्रपटात चमकली होती पुनम? (Poonam Pandey Bollywood Career)

पुनमच्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास तिनं २०१३ मध्ये बॉलीवूडमध्ये इंट्री केली. पुनमच्या वाट्याला फारसे चित्रपट काही आले नाही. तिनं तिच्या बोल्डनेसमधून काही काळ प्रेक्षकांचे मनोरंजन (Poonam Pandey Reality Show) करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या द जर्नी ऑफ कर्मा, मालिनी अँड कंपनी, दिल बोले हडिप्पा नावाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.

Poonam Pandey Death
Poonam Pandey : गुगलनं देखील केलं होतं बॅन!

पुनम ही तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त प्रतिक्रियांसाठी ओळखली जात होती. तिनं कित्येकदा सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे तिला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी सुनावले होते. पुनमनं काही रियॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. त्यात उल्लेख करायचा झाल्यास फिअर फॅक्टर - खतरो के खिलाडीचा करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com