
Pradip Sarkar: परिणिता फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन
Pradip sarkar Passed Away: बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं आज निधन झालं आहे .. त्यांनी वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला .. परिणीता, लागा चुनरी में दाग , मर्दांनी अश्या अनेक गाजलेल्या सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं ..
प्रदीप यांच्या निधनाने पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे .. कलाकार, तंत्रज्ञ असे अनेक सेलिब्रिटी सोशल मिडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत ..
(popular bollywood director pradip sarkar passed away)
सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता प्रदीप सरकार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रदीप सरकार यांनी बॉलिवूडला आजवर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. प्रदीप यांच्या अकस्मात निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रदीप यांच्यासोबत काम करणारे सहकारी आणि कलाकार अशा सगळ्यांनी शोक व्यक्त केलाय.
स्वानंद किरकिरे यांनी प्रदीप सरकार यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले कि, “चित्रपट निर्माता आणि सर्वात प्रिय मित्र प्रदीप सरकार हा वेडा माणूस आज सकाळी आम्हाला सोडून गेला. दादा तुमची सिनेमा कलेची आवड तुमच्या कामातून आम्हाला कायम दिसत राहील!
दुनिया भर की मिट्टी इकठ्ठी करते अब जन्नत की मिट्टी डीबिया में भरना. माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.” स्वानंद किरकीरे यांनी प्रदीप सरकार यांच्या परिणिता सिनेमासाठी पियू बोले हे सुंदर गाणं लिहिलं आहे.
हेलिकॉप्टर इला हा प्रदीप सरकार यांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा सिनेमा ठरला.