Phulrani Review: प्रियदर्शनी - सुबोधचा 'फुलराणी' गाजणार कि आपटणार? जाणून घ्या एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

phulrani. phulrani review, phulrani movie review, phulrani movie songs

Phulrani Review: प्रियदर्शनी - सुबोधचा 'फुलराणी' गाजणार कि आपटणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Phulrani Movie Review: पु. ल. देशपांडे लिखित ती फुलराणी हे नाटक मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलं. याच नाटकावर आधारित फुलराणी सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून फुलराणी सिनेमाची चर्चा होती. अखेर आज हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. कसा आहे फुलराणी सिनेमा? चांगला कि वाईट? जाणून घ्या..

काय आहे सिनेमाची कथा?

विश्वास जोशी दिग्दर्शित फुलराणी ही शेवंता (प्रियदर्शिनी इंदलकर) नावाच्या एका तरुण, बिनधास्त मुलीची कथा आहे, जी फुलांचे दुकान चालवते आणि ग्लॅमरच्या दुनियेत स्वतःची ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. अशातच ग्रूमिंग ट्रेनर विक्रमची (सुबोध भावे) नजर शेवंतावर जाते. मग पुढे 'प्रिटी प्रिन्सेस' स्पर्धा जिंकण्यासाठी कोणत्याही मुलीला तयार करून तिला मी जिंकवेल, अशी विक्रम त्याच्या पत्रकार मित्रासोबत (सुशांत शेलार) पैज लावतो.

मग विक्रम शेवंताला या स्पर्धेसाठी तयार करण्याचा प्रयत्न असतो. शेवंता सुद्धा तिच्या नेहमीच्या चौकटीतून बाहेर येऊन हि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत असते. शेवंता ते ब्युटी क्वीन असा खाचखळग्यांचा प्रवास, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना या सिनेमात दिसतात. एकूणच फुलराणी तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस ठरवलं तर यशाचं शिखर गाठू शकतो, याची प्रेरणादायी गोष्ट आपल्याला सांगतो.

कसा आहे कलाकरांचा अभिनय?

फुलराणी सिनेमाची मुख्य ताकद आहे ती म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीने तिच्या अभिनयाने चार चाँद लावले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सोज्वळ रूपात दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा रावडी अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल. सुबोध भावे सुद्धा ग्रूमिंग ट्रेलर विक्रमची भूमिका उत्तमपणे वठवतो. याशिवाय दिवंगत विक्रम गोखले यांचा अभिनय पाहणं सुखद भावना आहे.

भक्ती बर्वे यांनी रंगभूमीवर अजरामर केलेली फुलराणी सिनेमात भेटायला आलीय. जास्त अपेक्षा न ठेवता तुम्ही हा सिनेमा पाहिलात तर तुमचं नक्कीच मनोरंजन होईल.

अभिनयात सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून फुलराणीची शान वाढवण्याचा प्रयत्न केलाय तरीही काहीतरी मिसिंग वाटतं. एकूणच विश्वास जोशी दिग्दर्शित प्रियदर्शनी - सुबोधची फुलराणी एकदा पाहण्यासारखी नक्कीच आहे यात शंका नाही.

टॅग्स :Subodh BhavePriyadarshini