प्रसिध्द पंजाबी गायक सरदूल सिकंदर काळाच्या पडद्याआड 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 24 February 2021

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्वीट करुन श्रध्दांजली वाहिली आहे.

मुंबई -  आपल्या गायकीनं पंजाबी श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे प्रसिध्द गायक सरदूल मोहाली यांचे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. गेल्या आठवड्यापूर्वी ते किडनीच्या विकारानं त्रस्त होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मात्र ते कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात त्यांचा मृत्युनं गाठलं. सरदूल सिकंदर यांना आलाप आणि सारंग नावाची दोन मुले आहेत. ते दोघेही गायन क्षेत्रात नाव कमावले आहे.

सिकंदर यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्वीट करुन श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी श्रध्दांजली वाहताना लिहिले आहे की, एक महान गायक आज आपल्यातून गेले आहेत. त्यांचे जाणे धक्कादायक आहे. त्यांची झुंज एकाकी ठरली. त्यांच्या जाण्यानं पंजाब संगीत विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

पंजाबी गायक आणि गीतकार हॅप्पी रायकोटी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. सरदूल सिकंदर यांना लहानपणापासून गाण्याचा छंद होता. 1980 च्या दशकात त्यांनी रोडवेज दी लारी नावाचा एक अल्बम काढला होता. त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. तसेच त्यांनी जग्गा डाकू नावाच्या एका पंजाबी चित्रपटातही काम केले होते. चित्रपटात त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक प्रभावित झाले होते. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: popular punjabi singer sardool sikander passed away