Saaho : प्रभास पुन्हा येतोय... 'साहो'चे पोस्टर लॉन्च 

Tuesday, 21 May 2019

'बाहुबली'फेम प्रभास आता आगामी 'साहो' या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत झळकेल. आजच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. प्रभाससह या चित्रपटात श्रद्धा कपूर व नील नितीन मुकेशही दिसतील.

'बाहुबली'फेम प्रभास आता आगामी 'साहो' या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत झळकेल. आजच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. प्रभाससह या चित्रपटात श्रद्धा कपूर व नील नितीन मुकेशही दिसतील. पोस्टरवरून हा चित्रपट रहस्यमयी असल्याचे कळते. प्रभास 'साहो'द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल. हा चित्रपट तेलगु व तमीळ मध्ये प्रदर्शित होईल. 

'साहो'च्या पोस्टरवर प्रभास एका अँग्री मॅनच्या लूकमध्ये दिसतोय. त्याच्या सनग्लासेसमुळे हा पोस्टर खूप हीट होतोय. साय-फाय प्रकारातला हा चित्रपट असून प्रभास एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हे पोस्टर प्रदर्शित होताच काहीच वेळात सोशल मीडियावर हीट ठरला. #Saaho हा हॅशटॅगही काहीच वेळात ट्विटरवर ट्रेंडींग होता.

या चित्रपटासाठी प्रभासने हिंदीचे धडे घेतले असून श्रद्धा कपूर व प्रभास ही जोडी हीट ठरेल. दिग्दर्शक सुजित यांचा 'साहू' 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

'साहो' या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले आहे. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटात मुख्य भूमिका असलेली अभिनेत्री श्रध्दा कपूर हीने सोशल मिडीयावर सांगितले. साऊथ स्टार प्रभास 'साहो'मध्ये मुख्य भूमिकेत आहे. . . . . . . ‪@actorprabhas @sujeethsign @uvcreationsofficial @tseries.official @officialsaahomovie #15AugWithSaaho @shraddhakapoor #Bollywood #southondianmovie #PosterRelease #FirstLook #Saaho @tseries.official

A post shared by SakalMedia (@sakalmedia) on

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poster Launch Prabhas starrer Sahoo Hindi Movie