वरुण धवन म्हणतोय, 'Mr. लेले, मजा लेले'

टीम ईसकाळ
Monday, 13 January 2020

2021ची सुरवात कॉमेडी करण्यासाठी वरूण धवन आणि दिग्दर्शक शशांक खेतान सज्ज आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये 'मिस्टर लेले' हा भन्नाट कॉमेडी चित्रपट ते घेऊन येत आहेत.

वर्षाच्या सुरवातीलाच 'तानाजी' आणि 'छपाक' या चित्रपटांनी बॉलिवूडमध्ये हवा केलीय. आता वर्षभर चित्रपटांचा धुरळा उडणार हे नक्की.. अशातच 2020च्या सुरवातीलाच वरूण धवनच्या नवीन चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालंय. हे पोस्टर इतकं भन्नाट आहे की रिलीजनंतर काही वेळातच या चित्रपटाचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागलाय.

जेएनयुमध्ये गेल्याने दीपिकाला कोट्यवधींचा फटका, कसा काय?

2021ची सुरवात कॉमेडी करण्यासाठी वरूण धवन आणि दिग्दर्शक शशांक खेतान सज्ज आहेत. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये 'मिस्टर लेले' हा भन्नाट कॉमेडी चित्रपट ते घेऊन येत आहेत. आजच या चित्रपटाचे पोस्टर वरूणने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केले. या पोस्टरमध्ये वरूण धवन उघडा आहे. तो केवळ बॉक्सरमध्ये दिसतोय. त्याचे दोन्ही हात वर आहेत आणि त्याच्या एका हातात बंदूक आहे, तर दुसऱ्या हातात घड्याळ आहे. त्याला कोणीतरी विचित्र अवस्थेत पकडलंय असे हे पोस्टर आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या चित्रपटात वरूणसोबत भूमी पेजडणेकर व जान्हवी कपूर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बाबत अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही. 1 जानेवारी 2021ला हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या पोस्टरनेच सोशल मीडियावर हशा पिकवला आहे, आता चित्रपट काय जादू करेल याकेड सर्वांचे लक्ष लागून आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poster of Mr Lele shared by Varun Dhawan