Prabhas Fans: प्रभासच्या चाहत्यांनी का फोडले थिएटर अन् केला धिंगाणा? व्हिडिओ व्हायरल...

Prabhas' angry fans create ruckus, break theatre property during Yogi re-release
Prabhas' angry fans create ruckus, break theatre property during Yogi re-releaseEsakal

Prabhas' angry fans create ruckus Video Viral: साऊथ सुपरस्टार प्रभास गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तो त्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या 'आदिपुरुष' या चित्रपटामुळे चर्चेत होता. त्यानंतर त्याच्या आगामी 'सालार: पार्ट सीझफायर' या चित्रपटाने देखील त्याला लाईमलाईटमध्ये आणलं आहे.

प्रभासचे चाहते त्यांच्यासाठी किती वेडे आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे. प्रभासचे सिनेमे जरी फ्लॉप होत असले तरी त्याचा परिणाम त्याच्या फॅनवर झालेला नाही. प्रभासची क्रेझ आजही तितकीच आहे. प्रभासचे चाहते त्याच्यासाठी काहीही करु शकतात.

आदीपुरुष चित्रपटाबाबत एकानं वाईट प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्याच्या चाहत्यांनी त्याला मारलं होतं. असचं काहीस आता पुन्हा त्याच्या चाहत्यांनी केले आहे.

Prabhas' angry fans create ruckus, break theatre property during Yogi re-release
OMG 2 : 'आई बाबा म्हणाले, तू तो चित्रपट पाहायला जायचं नाही!' ओएमजीच्या कलाकारानं सांगितला अनुभव

प्रभासचे देशभरात लाखो चाहते आहेत. ते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात मात्र उत्साहात ते अनेकवेळा असं काही तरी करतात की त्याची चर्चा होते.

असचं काहीतरी आताही झालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रभासचा सुपरहिट चित्रपट 'योगी' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो पाहण्यासाठी गेलेल्या चाहत्यांनी थिएटरचं बरच नुकसान केलं. या व्हिडिओत त्याचे चाहचे बेभान होऊन नाचतांना दिसत आहे.

आंध्र प्रदेशातील नंदयाल येथील राज थिएटरमधून चाहत्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक स्क्रीनजवळ नाचताना दिसत आहेत. उत्साहामुळे ते पडद्यावर पडले त्यामुळे दोन्ही स्क्रीन फाटल्या आणि इतकच नाही तर त्यांनी थिएटरच्या सीटही मोडल्या त्यामुळे नंदयालमधील सिनेमागृहांनी या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं आहे.

(Prabhas Fans Attack on Sudarshan Theatre)

Prabhas' angry fans create ruckus, break theatre property during Yogi re-release
Rajinikanth-CM Yogi: थलायवा रजनीकांत घेणार योगी आदित्यनाथ यांची भेट! जेलरच्या यशाबाबत दिली प्रतिक्रिया

सध्या टॉलीवूडमध्ये री-रिलीज ट्रेंडची चागंली क्रेझ आहे. सुपरस्टार हिरोंचे जुने आणि हिट सिनेमे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येत आहेत. ज्याचा फायदा प्रॉडक्शन हाऊसला होत आहे. मात्र यावेळी प्रभासच्या चाहत्यांनी असं काही तरी केलं की त्याचे सिनेमे प्रदर्शित करणं थिएटर मालकांना बंद करावं लागलं आहे.

Prabhas' angry fans create ruckus, break theatre property during Yogi re-release
Gadar 2 Box Office Collection Day 8: सनी पाजीचा 'ढाई किलो का हाथ' सर्वांवर पडला भारी! आठ दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई

काही दिवसांपुर्वी प्रभास 'आदिपुरुष'मध्ये क्रिती सेनन सोबत दिसला होता. आता प्रभास अॅक्शन-थ्रिलर सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये आणि 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की 2898' या चित्रपटात दिसेल. प्रशांत नीलच्या 'सालार: पार्ट वन सीझफायर' व्यतिरिक्त, अभिनेत्याकडे 'राजा डिलक्स' चित्रपट देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com