Adipurush Jai Siya Ram: सीतेच्या विरहात व्याकुळ श्रीराम.. आदिपुरुष मधलं नवं गाणं ऐकून डोळ्यात येईल पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

adipurush, jai siya ram, jai siya ram song, adipurush full movie, adipurush box office, adipurush songs, ram siya ram

Adipurush Ram Siya Ram: सीतेच्या विरहात व्याकुळ श्रीराम.. आदिपुरुष मधलं नवं गाणं ऐकून डोळ्यात येईल पाणी

Jai Siya Ram Song Adipurush Movie New Song News: आदिपुरुष सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. आदिपुरुष सिनेमा आता अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आता आदिपुरुष सिनेमातलं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

राम सिया राम असं या गाण्याचं नाव असून या गाण्यात सीतेच्या आठवणीत विरहाच्या भावनेत व्याकुळ झालेले प्रभू श्रीराम दिसतात. हे गाणं पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

(Prabhas, Kriti Sanon long to reunite in stunning jai Siya Ram song in adipurush)

आदिपुरुष मधील राम सिया राम या नवीन गाण्यात सीता वनवासाला गेली असून राम तिच्या आठवणीत व्याकुळ झालेले दिसत आहेत.

याशिवाय श्रीराम आणि सीतेचा आनंदी सहवास दिसून येते. या गाण्यातील एका प्रसंगात सीतेला ओळख पटावी म्हणून श्रीरामांनी दिलेली हनुमानाला दिलेली अंगठी दिसते.

हनुमान लंकेला जाऊन सीतेची भेट घेतात, तो प्रसंग पाहायला मिळतो. एकूणच या गाण्याने श्रीराम आणि सीता यांच्यातल्या नात्याचा भावुक बंध दिसतो.

सध्या सगळीकडे ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची चर्चा आहे. आदिपुरुषचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. आदिपुरुषचा ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये प्रभास, क्रिती सेनन अनुक्रमे श्रीराम आणि सीतेच्या भूमिकेत झळकत आहेत. काहीच दिवसांपूर्वी आदिपुरुष सिनेमातलं पहिलं गाणं लाँच झालंय. या गाण्यातून श्रीरामभक्तीचा जागर दिसतोय.

आदिपुरुष सिनेमाच्या टिझर आणि ट्रेलरपासून बॅकग्राउंडला वाजणाऱ्या जय श्री राम गाण्याची उत्सुकता होती. अखेर आज भव्य दिव्य पद्धतीने सिनेमाचे संगीतकार आणि गाण्याचे गायक अजय अतुल यांच्या उपस्थितीत हे गाणं लाँच झालंय.

जय श्री राम हे गाणं ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. अजय - अतुलच्या संगीताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

आदिपुरुष या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन देवी सीता, सनी सिंग लक्ष्मण आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत.