kranti redkar, sameer wankhede drug case, sameer wankhede family, sameer wankhede wife
kranti redkar, sameer wankhede drug case, sameer wankhede family, sameer wankhede wifeSAKAL

Sameer Wankhede Case: मी शेंगा खाल्ल्या नाहीत.. नवऱ्याच्या प्रकरणावरुन क्रांती पुन्हा बरसली

क्रांतीचा नवरा आणि CBI अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान ड्रग केस प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय

Sameer Wankhede Wife Kranti Redkar Case News: अभिनेत्री क्रांती रेडकर ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

क्रांतीचा नवरा आणि CBI अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान ड्रग केस प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या संदर्भात नवऱ्याचं नाव न घेता क्रांती गेले काही दिवस सोशल मीडियावर विविध व्हिडिओ शेयर करत अप्रत्यक्षपणे सत्याची बाजू मांडतोय. क्रांतीने एक नवीन व्हिडिओ शेयर केलाय त्यात तिने लोकमान्य टिळकांची खास गोष्ट सांगितलीय.

(sameer wankhede wife kranti redkar shared new video as she tell story of lokmanya tilak)

kranti redkar, sameer wankhede drug case, sameer wankhede family, sameer wankhede wife
Bunty Walia: अबब..! निर्माता बंटी वालियाने केली ११९ कोटी रुपयांची बँक फसवणूक, CBI कडून गुन्हा दाखल

या व्हिडिओत क्रांतीने हिंदीत लोकमान्य टिळकांची एक गोष्ट सांगितली. हिंदी भाषिकांना सुद्धा समजावं म्हणून क्रांतीने मुद्दाम ती गोष्ट हिंदीत सांगितली.

ही गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळक आणि शेंगांच्या टरफलांची. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहितीये की, लोकमान्य टिळक जेव्हा शाळेत होतो तेव्हा मास्तर वर्गात आले.

त्यांनी बघितलं की वर्गात शेंगांची टरफलं विखुरली आहेत. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ती टरफलं उचलायला सांगितलं. तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले की, मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफलं उचलणार नाही.

kranti redkar, sameer wankhede drug case, sameer wankhede family, sameer wankhede wife
Madhurani Prabhulkar: मधुराणीला आहे 'या' गोष्टीची खंत

क्रांतीने लोकमान्य टिळकांची हीच गोष्ट सांगितली यापुढे क्रांती लिहिते. अन्यायाविरोधात आवाज उठवणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते.

अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर न्यायदेवतेचा सहारा घ्या. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा, असं क्रांती म्हणाली.

याआधी सुद्धा क्रांती रेडकरने व्हिडीओ शेअर करत म्हणाली होती.. मी जेव्हा छोटी होते तेव्हा माझ्या नानीने मला एक गोष्ट सांगितली होती. कलियुगाची गोष्ट.

ती म्हणायची हे कलियुग आहे.. या कलियुगात खोटं, धोका, दिखावा, कपट आहे. या कलियुगात सत्य गोष्टींना लोकं टिकून देत नाहीत.

जे लोकं खरं काम करतात त्यांच्यावर दबाव टाकण्याची संख्या जास्त आहे. पण असं चांगलं आणि खरं काम करणाऱ्या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडलं जाईल. तेव्हा पापाचा घडा भरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com