esakal | 'साहो' ही हुबेहुब कॉपी! चित्रपटावर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

is aaho copy of a french movie

'साहो' च्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. कारण, 'साहो' ने एका फ्रेंच चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप केला आहे. 

'साहो' ही हुबेहुब कॉपी! चित्रपटावर आरोप

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित चित्रपट 'साहो' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करत आहे. चार दिवसांत 100 कोटींचा आकडा गाठला आहे. त्याच्या रिव्ह्युविषयी अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यानंतर 'साहो' वर अभिनेत्री लिसा रे हिने शिले शिव सुलेमान या चित्रकाराचं चित्र कॉपी करुन वापरल्याचा  आरोप केला. आता मात्र 'साहो'च्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. कारण, 'साहो' ने एका फ्रेंच चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप केला आहे. 

फ्रेंच दिगर्दशक जेरोम साले याने 'साहो' च्या निर्मात्यांवर त्याच्या 'लार्गो विंच' या चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप केला आहे. सुनील नावाच्या एका व्यक्तीने जेरोम सालेला टॅग करत 30 ऑगस्टला एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्याने असं लिहिलं, "मित्रा दुसरा दिवस आणि तुमच्या 'लार्गो विंच' ची दुसरी फ्री कॉपी. #साहो. तुम्हीच खरे गुरु आहात". त्यानंतर स्वत: जेरोमने ट्विटरवर त्याचा रिप्लाय केला. त्यामध्ये जेरोमने लिहिलं,  "मला असं वाटतं भारतामध्ये माझं चांगलं करीअर होऊ शकतं."

मात्र एवढ्यावर शांत न बसता साहोच्या निर्मात्यांवर सणसणाती आरोप करणारं आणखी एक ट्विट केलं, "असं वाटत आहे की, 'साहो' हा 'लार्गो विंच' चा दुसरी फ्री कॉपी आहे जी पहिल्यासारखीच खराब आहे. तेलगु दिगर्दशकांनो, जर तुम्ही माझ्या चित्रपटाची कॉपी करत आहात तर ती किमान व्यवस्थित तरी करा. माझं पहिलं भारताविषयीचं ट्विट नक्कीच उपरोधिक होत पण, मला माफ करा. मी त्याविषयी काहीट करु शकत नाही."

'लार्गो विंच' हा फ्रेंच चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो याच नावाच्या वेल्जियम कॉमिक पुस्तकावर आधारित होता. 

loading image
go to top