Salaar Box Office Scam: प्रभासच्या 'सालार'च्या कमाईचे आकडे खोटे? सोशल मिडियावर का होतोय सालार बॉक्स ऑफिस स्कॅम ट्रेंड?

सालार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केलीच नसल्याचा दावा करत आता x वर #SalaarBoxOfficeScam ट्रेंड होत आहे.
SalaarBoxOfficeScam
SalaarBoxOfficeScam Esakal

SalaarBoxOfficeScam: प्रभासचा 'सालार' या चित्रपटाची प्रभासचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. हा सिनेमा प्रभासच्या फ्लॉप चित्रपटांचा रेकॉर्ड मोडणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर सालार 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात चांगले कलेक्शन करत आहे.

Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 'सालार' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 90.7 कोटी दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी व चौथ्या दिवशीही या चित्रपटाने 42.50 कोटींची कमाई केली होती.

आता पाचव्या दिवसाचे चित्रपटाने आतापर्यंत २३.५० कोटींची कमाई केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे सालारने बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन 278.90 कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे सालारच्या कमाईचे आकडे खोटे असल्याचं बोललं जात आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केलीच नसल्याचा दावा करत आता x वर #SalaarBoxOfficeScam ट्रेंड होत आहे.

SalaarBoxOfficeScam
Tripti Dimri: 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर चमकलं 'भाभी 2'चं नशीब! कार्तिक आर्यनसोबत या बिग बजेट सिनेमात झळकणार

‘सालार’ चित्रपटाचे निर्माते होमबाले फिल्म्सनी सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाच्या कलेक्शनबाबत केलेल्या सर्व अधिकृत पोस्ट डिलिट केल्या असल्याचा दावा एका पोस्टमध्ये होत आहे. इतकंच नाही तर 'डंकी' चित्रपटाचे कलेक्शन कमी असल्याने याचा फायदा घेत सालारने चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढवून सांगितल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात येत आहे. हा आरोप शाहरुखचे चाहते करत आहेत.

SalaarBoxOfficeScam
Rajinikanth wife fraud case: "सेलिब्रेटी असल्याची किंमत...", सुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीनं फेटाळले फसवणुकीचे आरोप! काय आहे नेमकं प्रकरण?

प्रभासचा सालार आणि शाहरुखचा डंकी यांची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा होत असल्याने या दोन्ही सुपरस्टारच्या चाहत्यांमध्येही सोशल मिडियावर वाद सुरु आहे.

सध्या सोशल मिडियावर असे अनेक ट्विट व्हायरल होत आहेत ज्यात सालारच्या कमाईचे आकडे खोटे असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रभासचे चाहतेही सालार चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. मात्र अद्याप या आरोपाबाबत प्रभास आणि सालारच्या निर्मात्यांनी काही भाष्य केलेले नाही.

यावेळी प्रभासच्या चाहत्यांनी सोशल मिडियावर एक ट्विट शेयर केले आहे. 'सालार सागा' या एका पेजने ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगितले आहे.

प्रभासच्या सालार(Salaar) चित्रपटाचा परिणाम नक्कीच शाहरुख खानच्या डंकी चित्रपटावर झाला आहे. एकीकडे सालारने आत्तापर्यंत 278.90 कोटींचे कलेक्शन केले आहे तर दुसरीकडे शाहरुख खान स्टारर डंकीने Sacknilk च्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 29.2 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथ्या दिवशीही 31.5 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 46.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

तर रिलिजच्या सहाव्या दिवशी 10.25 कोटींची कमाई केली आहे. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 140.20 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दोन्ही चित्रपटांच्या कमाईत बरीच तफावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com