esakal | "डॉ. डॉन'मध्ये प्रमुख भूमिकेत रत्नागिरीची `ही` अभिनेत्री
sakal

बोलून बातमी शोधा

Pradnya Chavande In Dr Don Ratnagiri Marathi News

लहानणापासूनच प्रज्ञा हीने येथे आपली चुणूक दाखवली. येथील प्रत्येक नृत्य स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावत अल्पावधीतच नाव कमावले.

"डॉ. डॉन'मध्ये प्रमुख भूमिकेत रत्नागिरीची `ही` अभिनेत्री

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - येथील अभिनेत्री प्रज्ञा चवंडे ही झी युवा वाहिनीवरील डॉ. डॉन या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. उद्यापासून (ता. 12) ही मालिका सुरू होणार असून अनेक मातब्बर कलाकारांसोबत काम करण्याची संधी प्रज्ञाला मिळाली आहे. 

लहानणापासूनच प्रज्ञा हीने येथे आपली चुणूक दाखवली. येथील प्रत्येक नृत्य स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावत अल्पावधीतच नाव कमावले. अनेक हौशी नाटकात व संस्थेत अभिनयाचे प्राथमिक धडे शिकणाऱ्या प्रज्ञाला सुहास भोळे यांनी जिज्ञासा थिएटर्सच्या "दि टर्निंग पाईंट' या नाटकात महत्त्वाची भूमिका दिली. पुढे ललित कला केंद्र, पुणे व नंतर मुंबईत नृत्य, अभिनयात शिक्षण घेत तीने अभिनय क्षेत्रात आपले नाव कोरले आहे.

रत्नागिरीत झालेल्या "फिल्लमबाजी' या मराठी चित्रपटातही तिने भूमिका साकारली. डॉ. डॉन ही मालिका तेजेंद्र नेसवणकर निर्मित असून थोडीशी विनोदी आणि नाट्यपूर्ण घडामोडी असलेली आहे. मालिकेचे दिग्दर्शन आशुतोष बावीसकर करत आहेत. वडिलांचे सत्य मुलीला समजल्यावर जी जी धमाल घडेल ते सारे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.