प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात थिरकले सेलिब्रिटी; साक्षी धोनीचे खास नृत्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा पटेल यांचा विवाह झाला. या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे बॉलिवूड कलाकार सोहळ्यात थिरकले.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. 

उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा यांचा विवाह झाला. या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे बॉलिवूड कलाकार सोहळ्यात थिरकले. विशेषतः साक्षी धोनीनेही स्टेज परफॉर्मन्स् दिली. साक्षी आणि पुर्णा या मैत्रीणी आहेत.

 

विवाह सोहळ्यानंतर वरळीतील एनएससीयामध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, शाहरुख खान, कॅटरिना कैफ, झहीर खान, सागरिका घाटगे-खान, नुसरत बारुचा, अंगद बेदी, नेहा धुपिया, महेंद्रसिंग धोनी या सर्वांनी हजेरी लावली होती. तर सलमान खानने पुर्णा यांच्या संगीत सोहळ्याला आपल्या स्वॅगने तर जॅकलीन फर्नांडीस हीने एक दोन तीन... मोजत थिरकवले.    

 

 

  

 

 

A post shared by FiFaFoo (@filmfashionfood) on

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praful Patel Daughter Poorna Patels Marriage Ceremony In Mumbai