
Video: नव्या कोऱ्या गाडीची नव्हे तर Prajakta Gaikwad ने केली खास सायकलची पूजा
Prajakta Gaikwad News: स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाडला संभाजी मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेमुळे कमालीची लोकप्रियता मिळाली.
प्राजक्ता सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
(Prajakta Gaikwad worshiped for a special bicycle)
कलाकार अनेकदा नव्या गाडीची पूजा करताना दिसतात. पण प्राजक्ताने मात्र खास सायकल विकत घेतलीय. प्राजक्ताने सायकलला हार आणि फुलं वाहिली आहेत. आणि सायकलची खास पूजा केलीय. प्राजक्ताच्या या व्हिडिओचं सगळीकडे कौतुक होतंय.
खूपदा कलाकार यशस्वी आल्यावर आलिशान गाडीची खरेदी करतात. पण प्राजक्ताने मात्र सायकल विकत घेऊन अनोखा आदर्श निर्माण केलाय.
प्राजक्ता फिटनेससाठी कायम आग्रही असलेली दिसते. त्यामुळे प्राजक्ताने गाडी ऐवजी सायकलला प्राधान्य दिलंय.
"अभिनंदन पेढे द्या छोटी असो वा मोठी सायकल काय गाडी काय एकच", "ताई तुमची simplicity पाहून खूप छान वाटत", अशा कमेंट करून प्राजक्ताच्या फॅन्सनी तिचं खास कौतुक करून अभिनंदन केलंय.
प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हेंसोबत शिवपुत्र संभाजी नाटकात अभिनय करत आहे. या नाटकाचे महाराष्ट्रभरात दौरे सुरु आहेत.
काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच १ ते ६ मार्च २०२३ दरम्यान जोल्ले शिक्षण संकुल निपाणी येथे या नाटकाचे भव्य दिव्य प्रयोग रंगले. या नाटकात प्राजक्ता छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारत आहेत.
प्राजक्ताने काही दिवसांपुर्वी तिच्या गावात एक कीर्तन आयोजित केलं होतं. प्राजक्ताचे आजोबा कै. तुकाराम हरिभाऊ खेडकर यांचं प्रथम पुण्यस्मरण होतं. त्यानिमिताने प्राजक्ताने गावकऱ्यांसाठी कीर्तन आयोजित केलं होतं.
त्यानिमित्ताने प्राजक्ताला आजोबांच्या आठवणीत रडू कोसळलं. प्राजक्ताने सोशल मीडियावर भावुक व्हिडिओ शेयर करून आजोबांविषयी भावना व्यक्त केल्या होत्या .