तुझा मेंदू तयार करताना देवाने.. Maharashtrachi Hasyajtra फेम सचिन गोस्वामींसाठी समीर चौगुलेची खास पोस्ट चर्चेत

समीर चौगुले यांनी खास पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आहे
samir chaugule, maharashtrachi hasyajatra, sachin goswami
samir chaugule, maharashtrachi hasyajatra, sachin goswamiSAKAL

Samir Chaugule Birthday Post On Sachin Goswami News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा लोकप्रिय करण्यात कलाकारांचा जितका वाटा आहे तितकाच मोलाचा वाटा मालिकेचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटेंचा आहे.

आज या सचिन जोडीपैकी सचिन गोस्वामी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला समीर चौगुले यांनी खास पोस्ट लिहिली आहे जी चर्चेत आहे.

(maharashtrachi hasyajatra fame samir chaugule birthday post on sachin goswami)

samir chaugule, maharashtrachi hasyajatra, sachin goswami
Rupali Bhosle: तू जणू सौंदर्यवती राजकन्या सगळ्यांना प्रेमात पाडणारी

समीर चौगुले यांनी सचिन गोस्वामी यांना कडकडून मिठी मारतानाचा एक फोटो शेयर केलाय. समीर चौगुले लिहितात.. "वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सचिन गोस्वामी .....हा फोटो माझ्या तुमच्या प्रती आणि तुमच्या माझ्या प्रती असलेल्या सर्व भावनांचा कोलाज आहे...

सातत्याने दर्जेदार आणि सुविहित विनोद निर्मिती करण्याची अजब शक्ती असलेला हा माणूस....या माणसाचा मेंदू तयार झाल्यावर देव ही अचंबित होऊन स्वतःशी म्हणाला असेल "अरे हे काय घडलं माझ्या हातून?".....

samir chaugule, maharashtrachi hasyajatra, sachin goswami
Satish Kaushik : बॉलिवूडचा कॅलेंडर; फक्त अभिनेताच नव्हे तर आणखी बरंच काही!

सचिन पुढे लिहितात.. "ही एक अशी अभिजात फॅक्टरी आहे ज्यात प्रत्येक कलाकाराने एकदा तरी "कामगार" म्हणून काम केलच पाहिजे.... "आपल नेमक काय चुकतंय"

या संभ्रमात आपण असताना सचिन गोस्वामी सर नामक सातत्याने आपल्या जवळ असणे हे आम्हा सर्वांसाठी खूप भाग्याचं आहे....रोज प्रहसन झाल्यावर पुन्हा कोरी पाटी घेऊन सरांसमोर रोज बसणे यालाच कदाचित "घडणे" म्हणतात....

समीर चौगुले शेवटी लिहितात.. "मालिका रंगभूमी चित्रपट सर्व माध्यमातील कामाचा अत्यंत प्रदीर्घ अनुभव, रोखठोक आणि सुस्पष्ट विचार, योग्य आणि चौकस परखड राजकीय आणि सामाजिक भान असणारे आमचे सर माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही मोठ्या भावा प्रमाणेच आहेत.......

सर तुम्ही आमच्या पाठीशी असणे हेच खूप धीर देणार आहे, आपल्या कामावर नितांत प्रेम वाढवणार आहे...तुम्हाला खूप खूप खूप प्रेम आणि आदर ...happy birthday सर..." अशी पोस्ट करत समीर चौगुले यांनी सचिन गोस्वामींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com