४२ आमदार घेऊन.. 'रानबाजार' मधील तो सीन होतोय व्हायराल.. एकदा बघाच..

आजची राजकीय उलथापालथ आणि 'रानबाजार' मधील तो सीन म्हणजे सेम टू सेम, होतेय.. चर्चा
prajakata mali and tejaswini pandit shared ranbazar video about todays maharashtra politics and eknath shinde revolt
prajakata mali and tejaswini pandit shared ranbazar video about todays maharashtra politics and eknath shinde revoltsakal

maharashtra politics : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. आता पर्यंत 40 आमदारांचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे. काही खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूणच राजकीय स्थिती पूर्णतः ढवळून निघाली आहे. एकनाथ शिंदे यांनी जणू स्वतःचा एक गट निर्माण केला आहे. या बंडामागे नेमकं काय कारण आहे याचा शोध अद्याप लागलेला नाही. परंतु सेनेला सत्ता सोडावी लागेल असे चित्र उभे केले जात आहे. अगदी असाच प्रसंग नुकत्याच येऊन गेलेल्या 'रानबाजार' या वेब सिरिज मध्ये दाखवण्यात आला होता. हा विडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा प्रसंग इतक्या तंतोतंत कसा जुळून आला असं संभ्रम प्रेक्षकांना पडला आहे. विशेष म्हणजे 'रानबजार' (ranbazar) मधील अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali)आणि तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) यांनीही तो विडिओ शेयर केला आहे. (prajakta mali and tejaswini pandit shared ranbazar video about todays maharashtra politics and eknath shinde revolt)

prajakata mali and tejaswini pandit shared ranbazar video about todays maharashtra politics and eknath shinde revolt
Eknath Shinde : किरण मानेंनी सांगितलं बंडामागील 'मोठं कारण'

या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या 'राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ' असे वाक्य समोर येते. पुढे एक दृश्य येते ज्यामध्ये मकरंद अनासपुरे यांचे काही डायलॉग आहेत. ते म्हणतात, 'सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत. पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा.' (ekanth shinde) (eknath shinde against shivsena) ()

पुढे या व्हिडीओमध्ये एका वाहिनीवर बातम्या सुरू असल्याचा आवाज येतो. त्याचे शब्द असे आहेत की, 'महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळलं.' असा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओला एक कॅप्शनही देण्यात आले आहे. 'रानबाजार.. काय मग बघताय ना?' असे ही अगदी सूचक कॅप्शन देण्यात आले आहे. ही दृश्य म्हणजे आजच्या स्थिती वरचे बोलके भाष्य होय. (eknath shinde against mahavikas aghadi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com