
साडी नेसली पण ब्लाउज विसरली.. प्राजक्ता माळीची भलतीच तऱ्हा..
अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. तिची लडीवाळ भाषा आणि साधेपणा कायमच प्रेक्षकांना भावत आला आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या तिच्या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. तिच्या कवितांवरही चाहते प्रेम करत आहेत. सध्या प्राजक्ताने काहीसे बोल्ड फोटशूट केले असून ते फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
हेही वाचा: मालिका सोडण्याबाबत हृता दुर्गुळेचे मोठे विधान, म्हणाली...
नुकत्याच आलेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटात प्राजक्ताने नैना चंद्रापुरकर या लावण्यवतीची भूमिका साकारली आहे. तिची सवाल जवाबाची लावणी चांगलीच गाजली. सध्या प्राजक्ता आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उघड पाठिंबा. भोंगे कधी बंद होणार याची ती आतुरतेने वाट पाहत आहे. या संदर्भात तिने आपले विचार खुलेपणाने व्यक्त केले आहे. यासोबतच आता प्राजक्ताच्या साडीची चर्चा सुरु झाली आहे.
हेही वाचा: यशोमती ठाकूर यांना भाजप कडून मुख्यमंत्री पदाची ऑफर,पण..
प्राजक्ता पारंपरिक लुक मध्ये कायमच खुलून दिसते. नुकतेच तिने साडी नेसून फोटोशूट केला आहे. परंतु हे फोटो भलतेच चर्चेत आले आहे. कारण प्राजक्ताने ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसली आहे. साडी नेसताना ब्लाऊज परिधान न करणं ही कसली फॅशन असा प्रश्न अनेकांना पडला. तसेच तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणाऱ्यासही सुरुवात केली.
‘प्राजक्ता ब्लाऊज परिधान करायला विसरलीस का?’ असा प्रश्न एका चाहत्याने तिला कमेंट्सच्या माध्यमातून विचारला आहेत. तर काही जणांनी ‘तू खूप गोड दिसत आहेस’ अशा चांगल्या कमेंट्सही केल्या आहेत. या फोटोमध्ये तिने आसामी सिल्क साडी परिधान केलेली दिसत आहे. तसेच साडीवर लाल आणि निळ्या रंगाचं वर्क पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने परिधान केलेले दागिने विशेष लक्ष वेधून घेणारे आहेत.
Web Title: Prajakta Mali Hot Photoshoot In Saree
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..