प्राजक्ता माळीला चाहता म्हणतोय... 'ओगं माझं पिल्लू', एकाने तर चक्क... | prajkta mali photo post on instagram | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prajakta mali photo

प्राजक्ता माळीला चाहता म्हणतोय... 'ओगं माझं पिल्लू', एकाने तर चक्क...

अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. तिची लडीवाळ भाषा आणि साधेपणा कायमच प्रेक्षकांना भावत आला आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या तिच्या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. तिच्या कवितांवरही चाहते प्रेम करत आहेत. सध्या प्राजक्ताने बोल्ड फोटशूट केले असून ते फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे.

हेही वाचा: बारा दिवसांचं बाळ घरी ठेऊन भारती सिंग सेटवर, म्हणाली...

प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रीस असून चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचे हे फोटो अत्यंत कमी वेळात व्हायरल झाले आहेत. (prajakta mali) प्राजक्ताने या फोटोमध्ये निळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये प्राजक्ताने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. प्राजक्ताने हे फोटो शेअर करत “बाबूजी धीरे चलना…प्यार में ज़रा…”, असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून तू खूप सुंदर दिसतेस, असे म्हंटले आहे. (prajakta mali photo post on instagram)

पण खरी गम्मत तर पुढे आहे, प्राजक्ताच्या या फोटोवर काही चाहत्यांनी दिलेल्या कमेंट पाहून हसू आवरणार नाही. एका चाहत्याने तिच्या कॅप्शनला जोडून म्हंटलं आहे, 'धीरे चालायचा प्रश्नच नाही, मी आधीच तुझ्या प्रेमात पडलोय.' तर दुसरा म्हणतो, 'हो.. धीरे ही चलुंगा'. एका चाहत्याने तर कहर केला आहे. प्राजक्ताला त्याने o my pillu.. अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ताला 'ओगं माझं पिल्लू' म्हणणाऱ्या या चाहत्या पाठोपाठ आणखी दोन चाहत्यांनी प्राजक्ताला प्रेमाचा सल्ला दिला आहे. 'वजन खूप वाढलं आहे', 'जाड झालीय' अशा या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्राजक्ताचा फोटोशूट या प्रतिक्रियांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. (funny comments on prajakta mali's post )

Web Title: Prajakta Mali Photo Post On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top