बारा दिवसांचं बाळ घरी ठेऊन भारती सिंग सेटवर, म्हणाली... | Bharti Singh leaves her 12-day old newborn at home, gets back to work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharati sing on set

बारा दिवसांचं बाळ घरी ठेऊन भारती सिंग सेटवर, म्हणाली...

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री भारती सिंगनं (Bharti Singh) आजवर आपल्याला भरपूर हसवलं. स्टॅंडप कॉमेडी असो, स्किट किंवा निवेदन तिन कायमच रसिकांची मनं जिंकली. कॉमेडी आणि भारती असं समीरकरण असलं तरी आता तिनं आपल्याला एक नवा आदर्श घालून दिला आहे. तो म्हणजे कामाबाबतच्या जिद्द, चिकाटी आणि शब्दाचा.

हेही वाचा: Photo: झगा झगा, मला बघा.. सई ताम्हणकरचा झगा पाहून डोळे फिरतील...

भारती प्रेग्नन्ट असूनही सेटवर काम करत होती. अनेकांना वाटलं ती आता सुट्टीवर जाईल मग जाईल. पण तिने तसं केलं नाही. अगदी प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती काम करत राहीली. आज अनेकदा आपण अशा काळात महिला प्रसूती रजेवर असलेल्या पाहतो. त्यामुळे भारतीने हे सगळे संकेत मोडून काम केलं. तिनं नुकतीच आपल्याला एक गोड बातमी दिली. चैत्र महिना सुरु झाला आणि तिच्या घरी एका गोंडस बाळाने जन्म घेतला. एका मुलाला जन्म देऊन भारती आई झाली.

हेही वाचा: हेमांगी कवी थिरकली दाक्षिणात्य गाण्यावर, तेही जावयासोबत? काय आहे प्रकरण?

या काळातही ती लोकांना वेगवगेळ्या व्हिडीओ बनवून हसवत होती. आपल्या प्रसूतीबाबत अपडेट देत होती. या सगळ्यात तिच्या पतीने म्हणजे हर्ष लिंबाचीयाने (hasrsh limbachiya) तिची भक्कम साथ दिली. बाळाला घेऊन घरी जाताना थकलेल्या अवस्थेतही भारती माध्यमांशी दोन शब्द बोलली. आणि आता बाळ अगदी लहान असतानाही तिने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. भारती चित्रीकरण स्थळी दाखल झाली असून तिने कामाला सुरुवात केली आहे. (Bharti Singh leaves her 12-day old newborn at home, gets back to work)

अवघ्या १२ दिवसांच्या तान्ह्या बाळाला घरी ठेवून भारती पुन्हा हुनरबाज या रिअॅलिटी शोच्या सेटवर परतली आहे. भारती सेटवर येताच सर्वांना आनंद झाला. त्यावेळी पापाराझींनी तिची वाट अडवली. यावेळी फोटोग्राफरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना भारतीला गहिवरून आलं. 'घरी १२ दिवसांच्या बाळाला सोडून आल्यामुळे मला खूप उदास वाटतंय. आज मी घरातून निघताना खूप रडले. पण काम आहे, कमिटमेंट केल्या आहेत, त्या पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामुळे मी इथं आले.' असं म्हणत भारतीने आपले अश्रू आवरले. या निमित्ताने भारतीने एक नवा आदर्श घालून दिलेला आहे. भारतीच्या या कृतीबद्दल सर्वांनी तिचे कौतुक केले असून समाज माध्यमांवर याची चर्चा आहे.

Web Title: Bharti Singh Leaves Her 12 Day Old Newborn At Home Gets Back To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..