esakal | डायरी वाचून आईने प्राजक्ताला चोपलं
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta mali

..अन् 'ती' डायरी वाचल्यानंतर आईने प्राजक्ताला बेदम चोपलं

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta mali) ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी हजेरी लावली होती. प्राजक्ताचे काही नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवाराने देखील तिला शुभेच्छा देण्यासाठी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी प्राजक्ताने एक जुनी आठवण सर्वांना सांगितली. (Prajakta mali recalled memories says My mother hit

काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये प्राजक्ताने तिच्या अनेक अठवणी शेअर केल्या. त्यावेळी प्राजक्ता म्हणाली, 'सर्वांना सगळं खरं आपण सांगू शकतो का? खरं सांगितल्यानंतर त्यांची मानसिकता काय असते? त्याचा ते कधी गैरफायदा घेतील का? त्याची थट्टा करतील का? असे कितीतरी विचार मनात येतात. त्यामुळे आपण सगळं सांगत नाही.'

डायरी वाचून आईने प्राजक्ताला चोपलं

प्राजक्ताने तिच्या डायरीबद्दलची आठवण देखील सांगितली. '2007-08 च्या डायऱ्यासुद्धा माझ्याजवळ आजही आहेत. त्या वाचताना मला खूप गंमत वाटते. हे सगळं लिहायला मला खूप आवडत होतं. पण एकदा माझ्या आईला माझी एक डायरी सापडली. तेव्हा मी आकरावीमध्ये होते. ती माझी वाट पाहात होती. मी घरी आल्यानंतर तिने मला झाडूनं बेदम चोपलं म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की मी त्यामध्ये काय, काय लिहीले असेल. त्या प्रसंगानंतर मी ठरवलं की मी रोजनिशी लिहीणार नाही. निदान कुलूप असलेला कप्पा मिळेपर्यंत तरी लिहीणार नाही.' प्राजक्ताची ही आठवण ऐकून तेथील उपस्थितांना हसू आवरले नाही.

हेही वाचा: 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' मधील शमिकाची लव्ह स्टोरी

सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोचे प्राजक्ता सुत्रसंचालन करत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमधील प्राजक्ताच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पार्टी, हंपी, डोक्याला शॉट या मराठी चित्रपटांमध्ये प्राजक्ताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत

हेही वाचा: Toofan Review; 'तुफान' एक छोटीशी वावटळ!

loading image