Prajakta Mali: मी लग्न करू की नको? चाहत्याचा सवाल.. प्राजक्ताचं भन्नाट उत्तर, म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prajakta mali reply to fan who comment on her photo for marriage

Prajakta Mali: मी लग्न करू की नको? चाहत्याचा सवाल.. प्राजक्ताचं भन्नाट उत्तर, म्हणाली..

Prajaktta Mali:  मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. पण यंदा तिच्या पोस्टची नाही तर पोस्टवरच्या कमेंटची चर्चा आहे. होय, कारण ती कमेंटच तशी आहे.

(prajakta mali reply to fan who comment on her photo for marriage )

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच प्राजक्तानं मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये हिरवी नववारी साडी आणि कोल्हापुरी दागिने प्राजक्ताने परिधान केले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. पण त्यातील एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या कमेंटला प्राजक्तानं देखील भन्नाट उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: Namrata Sambherao: तू असा जवळी रहा.. नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी खास पोस्ट

प्राजक्ताने या सुंदर फोटोसह एक कॅप्शनही दिले आहे. 'भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं. साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे. दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत. तेव्हा कुठे जाऊन लूक साधला गेला आणि आत्मा सुखावला.' असे तिने म्हंटले आहे. या लुक मध्ये प्राजक्ता प्रचंड देखणी दिसत आहे.

प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा नुसता भडिमार केला आहे. प्रत्येकजण मी तुझ्या प्रेमात आहे, लग्न करशील का, किती सुंदर दिसत आहे अशा कमेंट्स देत आहे. पण एका चाहत्याने मात्र कहरच केला आहे. त्याने थेट कमेंटमधून तिला विचारले आहे.. 'करु की नको लग्न मी सांगा?' अशी टी कमेंट आहे. या कमेंटला प्राजक्तानंही रिप्लाय दिला आहे. ती म्हणते, 'करुन टाका माझा काही भरवसा नाही' प्राजक्ताच्या हा भन्नाट रिप्लाय सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. तिची 'रानबाजार' वेब सिरिज असो 'वाय' सिनेमा किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते. काही दिवसांपूर्वी ती लंडन मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली होती. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते तसेच चाहत्यांशी संवादही साधत असते.

टॅग्स :prajakta mali