Prajakta Mali: "नेटफ्लिक्सवर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी..."; प्राजक्ता माळीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन भक्षक या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Prajakta Mali
Prajakta Mali

Prajakta Mali: गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील “भक्षक” (Bhakshak) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटात एका गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. आता अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन भक्षक या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

प्राजक्तानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बालिकाश्रमातील काही मुलींसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "2 दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला…कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं."

पुढे प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे.भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय." प्राजक्तानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali
Prajakta Mali: प्राजक्ताला सुद्धा 'जमाल कुडू'चा मोह आवरला नाही, सहकुटुंब केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

“भक्षक” पाहिल्यानंतर भूमीला आईनं दिली सोन्याची नाणी

भूमीनं काही दिवसांपूर्वी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "मी एक अभिनेत्री म्हणून मोठी झाली आहे असे जेव्हा आईला वाटते तेव्हा ती मला सोन्याचे नाणे देते. भक्षक पाहिल्यानंतर, मला आठवते की, आई किती भारावून गेली होती आणि मला कुठेतरी माहित होते की, ती मला आणखी एक सोन्याचं नाणं देईल. चित्रपट पाहिल्यानंतर मला कोणीच बोलले नाही. एकदा आम्ही घरी असताना समिक्षा माझ्याशी बोलू लागली आणि तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. ती म्हणाली,"हा चित्रपट तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे त्यापेक्षा, तो त्या मुलांसाठी जास्त महत्वाचा आहे. आज माझ्याकडे आईकडून मला 7 नाणी मिळाली आहेत.कुटुंबाकडून मिळालेल्या पुरस्कारापेक्षा कोणताही मोठा पुरस्कार नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com