The Kerala Story Controversy: 'कर्नाटक निवडणुकीत मत मिळवण्यासाठी...', प्रकाश राज यांचा सरकारवर पुन्हा निशाणा...

The Kerala Story Controversy
The Kerala Story ControversyEsakal

The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी' 5 मे रोजी बॉक्स ऑफिसवर रिलिज झाला. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांनाच चित्रपटाला पाठिंबा देखील खुप मिळाला. इतकच नाही तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील करत आहे.

अनेकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा म्हटलं आहे. भारतातील काही राज्यांमध्ये 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट करमुक्त करण्यात आला असताना, पश्चिम बंगाल सरकारने राज्यात चित्रपटावर बंदी घातली होती.

मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल सरकारला 'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनावर राज्यात बंदी घालण्याच्या 8 मे रोजी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. याचा अर्थ पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावरील बंदी उठवण्यात आली आहे.

The Kerala Story Controversy
Urmila Kothare: उर्मिलाचा फटाकडी अवतार पाहून चाहत्यांची विकेट, आता दिसणार..

दरम्यान, अभिनेता प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला. प्रकाश राज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते आपल्या भूमिकेवर ठाम राहून नेहमीच समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर

भाष्य करत असतात. त्याचबरोबर मोदी सरकारवरही टिका करत असतात. प्रकाश राज यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ते सोशल मीडियावर सक्रीय असून वेगवेगळ्या विषयांवर त्याचं परखड मत पोस्ट करतात. त्यांनी द केरळ स्टोरीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देखील त्याचं मत स्पष्ट केलं.

The Kerala Story Controversy
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan मधनं आयत्यावेळी काढून टाकला अब्दू रोझिकचा सीन.. सलमानची पर्वा न करता सिंगरनं खुलासा केलाच

प्रकाश राज यांनी इंस्टाग्राम हँडलवर 'द केरळ स्टोरी'चे पोस्टर शेअर केले असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'प्रिय सर्वोच्च नेते.. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकी मध्ये (#Karnatakaassemblyelections) मत मिळविण्यासाठी या काल्पनिक प्रोपगंडा चित्रपटाचा जोरदार प्रचार आणि वापर केल्याबद्दल तुमचं डिस्क्लेमर काय आहे..'

The Kerala Story Controversy
Devoleena Bhataacharjee: लव्ह-जिहाद प्रकरणात फसलं गोपी बहूचं लग्न..भडकलेली देबोलीना म्हणाली,'माझा नवरा..'

प्रकाश राज यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख केला आहे, ज्यामध्ये निर्माते डिस्क्लेमर ठेवतील की या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टींसाठी कोणतेही प्रामाणिक पुरावे उपलब्ध नाही असं म्हटले होते. याशिवाय केरळमधील हजारो महिलांचे धर्मांतरण झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा उल्लेख निर्मात्यांना करण्याचे आदेश दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com