Prakash Raj
Prakash Raj

Prakash Raj: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज यांना क्लीन चिट!

प्रणव ज्वेलर्सच्या 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज अडकले होते.
Published on

Prakash Raj News: साउथ सिनेसृष्टी आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज हे नेहमीच चर्चेत असतात. अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतात. राजकारणाशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश राज खुलेपणाने भाष्य करत असतात त्यामुळे अनेकदा अडचणीत येतात.

Prakash Raj
Viral VIdeo: ऐश्वर्याची आराध्या-करिनाचा तैमूर अन् शाहरुखचा अबराम! अंबानी शाळेच्या वार्षिक सोहळ्याला स्टार किड्सची हवा

काही दिवसांपुर्वी मनी लाँड्रिंग आणि ईडी चौकशीमुळे चर्चेत आले होते. प्रणव ज्वेलर्सच्या 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज अडकले होते. तेव्हापासून ते ईडीच्या निशाण्यावर होते, मात्र आता नुकताच या प्रकरणी प्रकाश राज यांना दिलासा मिळाला आहे. प्रणव ज्वेलर्सच्या 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्या प्रकरणी प्रकाश राज यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्याची माहिती त्यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये शेअर करत दिली आहे.

प्रकाश यांनी या प्रकरणाबाबत सुरू टिव्हीवर दाखवलेल्या बातम्यांचा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे, जो तमिळ भाषेत आहे. हा फोटो शेयर करत त्यांनी लिहिले, 'ज्यांना तमिळ समजत नाही त्यांच्यासाठी. ब्रेकिंग न्यूज - तपास पथकाची अधिकृत घोषणा. तामिळनाडूच्या प्रणव ज्वेलर्सच्या कोणत्याही पॉन्झी घोटाळ्यात अभिनेता प्रकाश राजचा सहभाग नाही.'

Prakash Raj
Anup Ghosal Death: 'तुझसे नाराज नही जिंदगी' फेम गायक अनूप घोषाल यांचे निधन

यासोबत त्यांनी लिहिलं, 'सत्यमेव जयते, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो.'

Prakash Raj
Matthew Perry: तब्बल दिड महिन्यानंतर अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं गूढ उकललं! 'या' गोळीने घेतला जीव!

नेमकं प्रकरण काय?

प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. लोकांना भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देऊन कंपनीने सुवर्ण योजनेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे त्याच्यावर आहे. मात्र नंतर रातोरात या कंपनीच्या शाखा बंद करण्यात आल्या.

ईडीने या फर्मवर २० नोव्हेंबर रोजी छापा टाकला होता. या कारवाईत ईडीने 23.70 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त केल्याचा दावा केला होता. आता या प्रकरणात प्रकाशल यांना दिलासा मिळाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com