Prarthana Behere: नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ शेयर करत प्रार्थना म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prarthana Behere shared romantic video with husband Abhishek Javkar  they complete five year togetherness anniversary

Prarthana Behere: नवऱ्यासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ शेयर करत प्रार्थना म्हणाली..

prarthana behere: मालिका. चित्रपट या माध्यमातून रसिकांच्या घराघरात आणि मनमनात पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे व्हिडिओ, फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आज तर तिने चक्क आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच अभिषेक जवकर सोबत एक रोमॅंटिक व्हिडिओ शेयर केला आहे. त्याचे निमित्तही तसेच खास आहे.. तेच जाणून घेऊया..

(Prarthana Behere shared romantic video with husband Abhishek Javkar they complete five year togetherness anniversary)

हेही वाचा: Childrens Day 2022: आज हे चित्रपट बघाच! तुम्हाला तुमचं बालपण आठवल्यावाचून राहणार नाही..

प्रार्थनाने आज हा व्हिडिओ शेयर केला कारण त्यामागे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे प्रार्थनाने 14 नोव्हेंबर 2017 मध्ये अभिषेक जावकर सोबत लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच निमित्ताने तिने दोघांमधील एक गोड क्षण चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. या व्हिडिओला तिने 'हॅप्पी 5' असे कॅप्शनही दिले आहे.

हेही वाचा: Ranvir Shorey: इलॉन मस्कने ट्विटरचा अभ्यास करावा! अभिनेता रणवीर शौरीचं ट्विट गाजतंय..

अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती. पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मितीत येण्याचा सल्ला दिला आणि तो निर्मिती क्षेत्रात आला. आज तो यशस्वी निर्माता आहे.

तर प्रार्थनाने 'मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केले. अल्पावधीतच तिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतील नेहाच्या पात्राने पुन्हा तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवंल आहे. मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ती अँड ती’, ‘फुगे’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारखे मराठी चित्रपट केले आहेत. प्रार्थनाने शेयर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

टॅग्स :prarthana behere