Ranvir Shorey: एलॉन मस्कने ट्विटरचा अभ्यास करावा! अभिनेता रणवीर शौरीचं ट्विट गाजतंय.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranvir Shorey wants Elon Musk to take advice from him on running Twitter

Ranvir Shorey: इलॉन मस्कने ट्विटरचा अभ्यास करावा! अभिनेता रणवीर शौरीचं ट्विट गाजतंय..

elon musk: इलॉन मस्कने जेव्हा पासून ट्विटर आपल्या ताब्यात घेतलं आहे तेव्हापासून रोज नवनवीन नियम तो लागू करत आहे. या नियमांचे कुठे कौतुक होतेय तर कुठे जोरदार टीका केली जात आहे. ट्विटरवर मिळणाऱ्या ब्ल्यु टिकसाठी पैसे आकरण्याचा नियमही करण्यात आला होता, परंतु तो इतक्या टिकेनंतर मागे घेण्यात आला. आता अभिनेता रणवीर शौरीने इलॉन मस्कची खिल्ली उडवली आहे. ट्विटर कसे चालवायचे हे इॅलानने आधी शिकून घ्यावे असा थेट निशाणा त्याने साधला आहे.

(Ranvir Shorey wants Elon Musk to take advice from him on running Twitter)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: दो हंसो का जोडा बिछड गयो रे.. रुचिरा जाधव घराबाहेर !

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून तो अनेक नियमांची छेडछाड करत आहे. ट्विटरच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कंपनीतून काढून टाकण्यात आले. यामुळे कंपनीची प्रतिमा मलिन झाली आहे. याच सर्व गोंधळाबद्दल रणवीर शौरीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी इलॉन मस्कलाही टॅग केले आहे.

हेही वाचा: Childrens Day 2022: आज हे चित्रपट बघाच! तुम्हाला तुमचं बालपण आठवल्यावाचून राहणार नाही..

ट्विटरवर इलॉन मस्कला टॅग करत रणवीर शौरीने लिहिले, 'मी 2 दिवसांचा ब्रेक काय घेतला आणि ट्विटरची अवस्था बिकट झाली आहे. इलॉन मस्क यांनी माझा सल्ला घ्यावा. मी अनेक वर्षांपासून ट्विटर वापरत आहे. पूर्वी असे काही नियम नव्हते पण आता जेव्हा पासून इलॉन मस्क ट्विटरचा मालक झाला आहे तेव्हापासून परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे इलॉन मस्कने आधी ट्विटरचा अभ्यास करावा.' असा टोला त्याने लगावला आहे.

रणवीर शौरी ट्विटरवर बराच सक्रिय असतो. तो अनेक मुद्यांवर आपले विचार मांडत असतो. शिवाय चाहत्यांशी संवादही साधत असतो. त्याचे ही ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :Bollywood NewsElon Musk