Prarthana Behere: 'तुम्ही तितक्याच घाण हसता'… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prarthana Behere

Prarthana Behere: 'तुम्ही तितक्याच घाण हसता'…

‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने सिने सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतील नेहाच्या पात्राने पुन्हा तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवंल आहे.

मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ती अँड ती’, ‘फुगे’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारखे मराठी चित्रपट केले आहेत.‘माझी तुझी रेशीगाठ’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानतंर तिने नुकतीच झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

या कार्यक्रमात तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केलेत. यात तिने तिच्या आयुष्यातील काही किस्से सांगितले. तिने सांगितलेला एका किस्सा ऐकून शोच्या स्टेजवर एकच हशा पिकला.

तो किस्सा सांगताना ती म्हणाली की ‘माझ्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवर एका सहाय्यक दिग्दर्शकाने मला अस सांगितले की मॅडम तुम्ही खूप छान दिसतात मात्र तितक्याच घाण हसता’, विषेश म्हणजेच हा किस्सा सांगताना प्रार्थनाचं खुप हसत होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुबोध भावे यांना तर त्याचे हसू आवरलेच जात नव्हते.त्यानतंर तिने तिच्या हसण्यावर कन्ट्रोल केल्याचं ती म्हणाली.यानंतर तिने हसण्याचे प्रकार दाखवले.लाजून कसं हसतात हे दाखवलं.

हेही वाचा: 'Big Boss 4’ ला मागे टाकत दीपा,अरुंधती बनल्या टीआरपीच्या 'बॉस'...

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमात आतापर्यंत साई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, श्रेया बुगडे यांसारख्या अभिनेत्री येऊन गेल्या आहेत तर पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यासारख्या राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांनी देखील येऊन आपल्या आयूष्याबाबत खूलासे केले आहेत.