प्रसाद ओक म्हणाला,'आपल्याकडे एकमेकांचं भलं झालेलं पाहू शकणारी माणसंच नाहीत' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasad oak on marathi film

प्रसाद ओक म्हणाला,'आपल्याकडे एकमेकांचं भलं झालेलं पाहू शकणारी माणसंच नाहीत'

अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला कलाकार आहे. काही दिवसांपूर्वी येऊन गेलेला त्याचा 'चंद्रमुखी' चित्रपट आणि नुकताच रिलीज झालेला 'धर्मवीर' या दोन्ही सिनेमांमुळे सर्वत्र प्रसादचीच हवा आहे. 'चंद्रमुखी' (chandramukhi) या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. तर 'धर्मवीर' (dharmveer) मध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. प्रसादचा लुक आणि भूमिकेच कौतुक होत असतानाच त्याच्या एका विधानाची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने एका मुलाखतीती दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतबाबत महत्वाचे विधान केले.

हेही वाचा: दिपाली सय्यद : अमित ठाकरेंना नोटीस पाठवली नाही ही उध्दव ठाकरेंची मेहरबानी

दाक्षिणात्य चित्रपटांनी सध्या बॉलीवूडलाही मागे टाकले आहे. या चित्रपटांचे होणारे बहुभाषेतील डबिंग आणि प्रेक्षकांची पसंती यामुळे हे चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगलेच चालत आहेत. तमिळ, तेलुगू, मल्याळम हे चित्रपट प्रादेशिक भाषांमधील असूनही ते इतके पुढे गेले आहेत मग मराठीत असं का होत नाही असा प्रश्न एका मुलाखतीत प्रसाद ओकला विचारण्यात आला. त्यावेळी त्याने एक महत्वाचे विधान केले.

“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोणत्याही अभिनेत्याचा चित्रपट आला तरी तिथले अभिनेते कोणतीही ईर्षा न बाळगता ते प्रमोट करताना दिसतात किंवा अल्लू अर्जुनच्या चित्रपटात दुय्यम भूमिका साकारताना फहाद फासिल सारख्या अभिनेत्याला कोणताही कमीपणा वाटत नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि तिथल्या कलाकारांमध्ये एकी आहे. ते एकमेकांना धरून आहेत. ते आपल्याकडे पाहायला मिळत नाही आणि ती एकी आपल्याकडे कधीच पाहायला मिळणारही नाही. कारण आपल्याकडे एकमेकांचं भलं झालेलं पाहू शकणारी माणसंच नाहीत,' असे प्रसाद ओक म्हणाला. त्याच्या या विधानाची चित्रपट सृष्टीत बरीच चर्चा आहे.

Web Title: Prasad Oak Reaction On Marathi Film Industry And South Film Industry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top