दिपाली सय्यद : अमित ठाकरेंना नोटीस पाठवली नाही ही उध्दव ठाकरेंची मेहरबानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepali sayed tweets on raj thackeray

दिपाली सय्यद : अमित ठाकरेंना नोटीस पाठवली नाही ही उध्दव ठाकरेंची मेहरबानी

Deepali sayed : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात.त्या सोशल मीडियावर व्हि़डिओज आणि फोटोज शेअर करत त्यांचे परखड मत मांडत असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या गेल्या काही भाषणातल्या वक्तव्यामुळे फार चर्चेत आले आहेत. ते भाजपासोबत युवती करणार की काय अशा चर्चांनाही वाचा फुटली होती. तर एकीकडे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर टिका केली जात आहे.(Raj Thackeray)आता यात दीपाली सय्यद देखील उतरल्या आहेत. गेली काही दिवस त्या राज ठाकरे यांच्यावर सतत निशाणा साधत आहेत.

हेही वाचा: Sakal exclusive : हेमंत ढोमेने उडवली पालिकेची झोप, म्हणाला किशोरीताई..

दिपाली सय्यदने नुकतेच तीच्या ट्विटर अकाऊंट वरुन लिहीले होते की, "तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको".या ट्वीटमधे त्यांनी राज ठाकरे,मनसे अधिकृत आणि शिवसेनेला मेंशन केले होते. त्यावरुन सुरु असलेला वाद अजून मिटलेला नसतानाच आता पुन्हा दिपाली सय्यदने राज ठाकरेंना डिवचले आहे.

हेही वाचा: Photo: अबब !.. सोनाली कुलकर्णीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल..

'अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही हि उद्धव साहेबांची मेहरबानी राज साहेबांनी विसरू नये , सहनशीलता हि निवडणुकीत दाखवायची असते. स्वयंघोषित हिंदुजननायक करून ताम्रपट मिळत नाही.' असे ट्वीट त्यांनी राज ठाकरेंना उद्देशून केले आहे.

दिपाली सय्यद आता राजकारणात कंबर कसूम उतरलेली दिसते. याआधीही दिपालीने केलेल्या महागाईच्या ट्वीटने चर्चेला उधाण आले होते."मोदिंना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणाऱ्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही"या त्यांच्या ट्वीटने तर माेठा वाद निर्माण झाला होता.

Web Title: Deepali Sayed Tweets On Raj Thackeray Should Not Forget That Uddhav Sahebs Kindness Was Not Sent Notice To Amit Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top