Exclusive:-''तिच्या एंट्रीवर मी शिट्टया मारायचो''

'ईसकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीतून जाणून घ्या प्रशांत दामले यांची फेव्हरेट 'ती' कोण...
Prashant Damle
Prashant DamleGoogle

नाटकावर आजन्म प्रेम करीत रंगमंचाशी एकनिष्ठ राहणं ज्यांना पुरेपूर जमलं ते म्हणजे प्रशांत दामले. आपली चांगली चाललेली हातची नोकरी सोडून फक्त नाटकावर आपलं घर पोसण्याची तयारी दाखवणं हा निर्णय तसा त्यांच्यासाठी कठीण होता. पण नाट्यक्षेत्रातले विक्रमादित्य म्हणून ज्यांची ओळख आहे अशा प्रशांत दामले(Prashant Damle) यांनी प्रत्यक्ष आयुष्यातही अशक्य वाटेल अशी गोष्ट शक्य करून एकप्रकारे विक्रमच करून दाखवला आहे. 'ईसकाळ'ला दिलेली त्यांची खुसखुशीत मुलाखत ही ऐकायलाच हवी. ती पॉडकास्ट मुलाखत इथे आम्ही जोडत आहोत. ज्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत प्रशांत दामले यांनी अभिनयक्षेत्रातील आपली आवडती 'ती' कोण,जिला पाहून आपण शिट्ट्या मारल्या आहेत तिच्याविषयी बिनधास्त वक्तव्य केलं आहे.

Prashant Damle
हॉट सई ताम्हणकर खादी जम्पसूटमध्ये दिसलीय खूपच स्टायलिश..

तसंच 'अंडर द बेल्ट' विनोद न करताही प्रसिद्ध झालेल्या विनोदी कलाकारांना मानवंदना करीत त्यांनी आपला जवळचा मित्र 'नाटक' आहे असं सांगताना छान भावूक होऊन त्याच्याशी मुलाखतीच्या शेवटाला संवादही साधला आहे. याच मुलाखतीत त्यांनी आजच्या तीन अशा मराठी कलाकारांची थेट नावं घेतली आहेत, ज्यांना त्यांनी इतर ठिकाणी सिनेमा,मालिकांमध्ये काम करून पैसा भले कमवत आहात,नाव कमवत आहात पण एखादं नाटक करून त्याचे किमान पाचशे प्रयोग तरी करा असा प्रेमळ सल्ला देत दमही भरलेला आहे. ज्यांच्याविषयी बोलताना दस्तुरखुद्द विक्रमादित्य प्रशांत दामले असंही म्हणालेयत की त्या नटांचं भाषेवरचं प्रभुत्त्व माझ्यापेक्षाही जास्त आहे. तसंच,आजच्या घडीचा एक तरुण धडाडीचा आणि आश्वासक अभिनेता आहे ज्याची अगदी त्यांनी मनापासून तारीफ केलीय . तसंच नाट्यक्षेत्राचा खरा वारसदार हा अभिनेता ठरू शकतो इतकं मोठं वक्तव्य करताना 'तोच का?' यामागचं कारणही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

प्रशांत दामले यांची इथे जोडलेली ही खुसखुशीत मुलाखत नक्की ऐका. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर इथे मिळतील.

नाटक सुरू असताना एक अनाऊंसमेंट होते जी खास प्रेक्षकांसाठी असते ती अशी की,''प्रेक्षकांनी मोबाईल स्वीचऑफ करावेत आणि सोबत लहान मुलांनाही सायलेंट मोडवर टाकावं''. पण आपल्याला नाटकाच्या सुरुवातीला या सुचना देणं आवडत नसल्याचं प्रशांत दामले म्हणाले आहेत आणि त्यामागचं कारण जर ऐकलात तर हसून हसून लोटपोट व्हाल ही खात्री आहे आम्हाला. आज साठाव्या वर्षातही चेह-यावर दिसणारा तोच तजेला कायम कसा यावर बोलताना त्यांनी आपल्या दिसण्याचं आणि उत्साहीपणामागचं रहस्य खुलेआमपणे सर्वांना सांगितलं आहे हातचं काहीही राखून नं ठेवता. नवीन वर्षात मार्चमध्ये नवीन नाटक आणतोय हे सांगतानाच मला 'टूरटूर' हे जुनं गाजलेलं नाटक रंगमंचावर पुन्हा आणायला काहीच हरकत नाही पण मला ते आणण्याचा हक्क नाही,तो हक्क एकाच व्यक्तीकडे हे सांगताना त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांनी नकळत त्यांच्याकडे टूरटूर नाटकाचे हक्कच मागितले नाहीत ना असा भास मुलाखत ऐकताना नक्की आपल्याला होईल. प्रशांत दामले यांची खुसखुशीत,चटपटीत अशी ही मुलाखत वर जोडलेली आहे ती नक्की ऐका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com