Prashant damle write a letter to CM आता आमची होणारी फरफट थांबवा,नाट्यगृह 100 टक्के क्षमतेने चालवा Uddhav Thakre CM | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Damle

प्रशांत दामले म्हणाले,''या तर वाटाण्याच्या अक्षता!''

कोरोनाचा फटका गेल्या दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रांना बसला आहे. बेकारी-बेरोजगारी आणि त्यामुळं बसलेला आर्थिक फटका सहन करताना अनेकांनी आत्महत्येचा पर्यायही निवडला. आता कोरोनाच्या या विळख्यातून मनोरंजन क्षेत्रही सुटलं नाही हे वेगळं सांगायला नकोच. सिनेमांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला असला तरीही नाटकांना असं कुठलं प्लॅटफॉर्म उपलब्ध न झाल्याने नाटयक्षेत्राला मात्र नाट्यगृह खुली होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.

Theatre,public

Theatre,public

गेल्या महिन्याच्या शेवटाला अखेर ठाकरे सरकारने खूप विनवण्य़ा केल्यानंतर नाट्यगृह खुली करण्याची परवानगी दिली खरी पण भरपूर अटींसोबत. त्यात नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेनेच चालतील आणि दोन डोस घेतलेल्यांनाच तिकीट विक्री केली जाईल अशा अटी होत्या. पण आता महिन्याभरानंतर नाट्यनिर्मांत्यांच्या लक्षात येऊ लागलंय की या अटींमुळे आपल्य़ाला काहीच फायदा होत नाही. लांबच्या ठिकाणी नाटक नेताना होणारा प्रवासाचा खर्चही निघत नाही. येणा-या तुटपुंज्या पैशात बॅकस्टेज आर्टिस्ट,मुख्य कलाकार अशा सगळ्यांचं मानधन निघणार कसं? आणि त्यामुळेच आता आमची होणारी फरफट थांबवा,नाट्यगृह 100 टक्के क्षमतेने चालवा असा सुर नाट्यक्षेत्रातनं निघत आहे.

हेही वाचा: ''हा काय हिरो आहे,मुलीसारखा तर दिसतो....''

आज प्रशांत दामले(Prashant Damle) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांना नाट्यगृह 100 टक्के क्षमतेनं खुली व्हावीत यासंदर्भात आवाहन केलं आहे. या आवाहनासंदर्भात ईसकाळ टीमशी बोलताना प्रशांत दामले म्हणाले की,''आम्हाला 50टक्के क्षमतेनं नाटक करताना खूप अडचण येतेय. होणारा खर्च भागवताना तसंच कलाकार,बॅकस्टेज आर्टिस्टचं मानधन देताना नाकीनऊ येतायत. मुंबई,पुणे सोडून इतर लांबच्या जिल्हयांत नाटक आम्ही यामुळे न्यायचं नाही का? आता आम्हाला प्रवासात टोल माफी आणि नाट्यगृहांच्या दरात 75 टक्के सूट जी सध्या देण्यात आली आहे ती पुढील दोन वर्ष कायम रहावी.''

loading image
go to top