प्रथमेश होणार "टल्ली' 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असणारा प्रथमेश परब आता एक नवा विनोदीपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "टल्ली' असे या चित्रपटाचे नाव आहे.

मुंबई : सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असणारा प्रथमेश परब आता एक नवा विनोदीपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "टल्ली' असे या चित्रपटाचे नाव आहे.

प्रथमेश त्याच्या या नव्या चित्रपटासाठी फारच उत्साही आहे. तो म्हणतो, "माझ्या विनोदी भूमिकांना आजवर सिनेरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. "टल्ली' हा त्यातीलच एक चित्रपट आहे. पण यामधून एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.

या चित्रपटासाठी मी माझ्या लूकवरही मेहनत घेणार आहे.' गणेश-सुरेश हे संगीत-दिग्दर्शक या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले आहेत. निर्मिती संजय गोळपकर यांची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prathmesh Parab will play lead actor in Talli movie