
'मुंबई पोलिसांनी खेचत नेत गोदामात...'; अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
बॉलीवूड(Bollywood) अभिनेता प्रतिक गांधीला(Pratik Gandhi) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police)अपमानास्पद वागणुकीचा सामना करायला लागला आहे. अभिनेत्यानं ही अत्यंत चुकीची वागणूक असल्याचं म्हटलं आहे. प्रतिक गांधीनं मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे की,पोलिसांनी त्याचा अपमान केला आहे. ही घटना रविवारची,म्हणजे २४ एप्रिल २०२२ ची आहे. मुंबईच्या हायवेवर व्हीआयपीं साठी रस्ता ब्लॉक करताना मुंबई पोलिसांनी अभिनेत्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली.
या घटनेविषयीची माहिती स्वतः प्रतिक गांधीनं सोशल मीडियावर(Social Media) पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. प्रतिक गांधी सोशल मीडियावर खूप सक्रिय पहायला मिळतो. त्यानं आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर मुंबई पोलिसांच्या विरोधात ट्वीट केलं आहे. प्रतिक गांधीनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे व्हीआयपी येणार असल्या कारणानं जाम होता. इतर गाड्यांना थांबवून ठेवण्यात आल्याकारणानं रस्ता पूर्ण ब्लॉक झाला होता. मी शूटिंगला वेळेत पोहोचावं म्हणून गाडी सोडून पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा तिथे तैनात पोलिसांनी मला खांद्याला पकडून खेचत नेलं आणि एका मार्बल गोडाऊनमध्ये कारणाशिवाय ताटकळत ठेवलं. आणि मला याचं कारणही सांगितलं नाही. मला अपमानास्पद वागणूक दिली''.
हेही वाचा: Lock upp: 'लग्न झालेल्या पुरुषांमध्ये वेगळीच...'; आझमा फलाहची रंगली चर्चा
सोशल मीडियावर प्रथिक गांधीचं ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांनी आणि सर्वच नेटकऱ्यांनी त्याच्या ट्वीटवर याविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच काहींनी मुंबई पोलिसांनी असं का केलं याविषयी त्याला माहिती देताना सांगितलं आहे की.मुंबई पोलिसांनी एक दिवस आधी शहरातील लोकांना रविवारी ३ ते ९ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे व्हीआयपी मूव्हमेंटसाठी जाम असेल अशी आगाऊ सूचना दिली होती. त्यामुळे कदाचित कामाच्या प्रेशरमध्ये ही चूक त्यांच्याकडून घडली असावी. तर काहींनी व्हीआयपी नेत्यांसाठी सर्वसामान्यांना त्रास देणारा हा प्रकार मुंबईत नेहमीच पहायला मिळतो असंही म्हटलं आहे.
हेही वाचा: 'Animal' च्या सेटवरुन रणबीर-रश्मिकाचा फोटो लीक; सुपर क्यूट दिसली नवी जोडी
प्रतिक गांधीच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्याची 'द ग्रट इंडियन मर्डर' ही वेबसीरिज काही दिवसांपू्र्वी भेटीस आली होती. त्याच्या या वेबसिरीजला खूप पसंतही केलं गेलं होतं. या व्यतिरिक्त प्रतिक गांधी 'वो लडकी है कहां' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तापसी पन्नू काम करीत आहे. तापसी आणि प्रतिक पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना या सिनेमाच्या माध्यमातून दिसणार आहेत.
Web Title: Pratik Gandhi Humiliated By Mumbai Police During Vip Movement Almost Pushed Into Random
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..