‘अग्निहोत्र २ मध्ये लवकरच प्रतिक्षा मुणगेकरची होणार एन्ट्री

pratiksha mungekar to enter in Agnihotra 2
pratiksha mungekar to enter in Agnihotra 2
Updated on

मुंबई : दहा वर्षांचा काळ लोटला तरी 'अग्नीहोत्र' या मालिकेविषयी जिव्हाळा प्रेक्षकांशी कायम आहे. नुकताच या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अग्निहोत्र २’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला पतिसाद मिळतो आहे. याआधीच्या पर्वामध्ये आठ गणपतींचे रहस्य दाखविण्यात आले होते. आताच्या पर्वामध्ये नाशिकच्या वाड्याचं रहस्य आणि 'सप्तमातृक' याचा उलघडा होणार आहे. याच सप्तमातृकांच्या भूमिकेमध्ये सात अभिनेत्री दिसणार आहेत. त्यातच आता नव्या व्यक्तीरेखेसह अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर दिसणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

# 2day's to go #agnihotra2

A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on

अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. समीहा पै असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव असून ती एक वास्तुशास्त्रज्ञ आहे. लवकरच तिची एन्ट्री मालिकेमध्ये होणार आहे. मालिकेमध्ये नवनवीन पात्रांचा उलघडा होतोय आणि त्याच्यासोबतच लोकांमधील उत्सुकता अधिक वाढतेय. या मालिकेमध्ये समीहाला भारतीय संस्कृतीला परदेशात कशाप्रकारे घेऊन जाता येईल याच्या प्रयत्नात ती असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Mungekar Pratiksha (@mungekarpratiksha) on

या विषयी बोलताना प्रतिक्षा म्हणाली, ' अग्नीहोत्र 2 ही मालिका माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. मालिकेतलं माझं पात्र म्हणजे समिहा अतीशय बिनधास्त मुलगी आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव तिला पसंत नाही. माझा या मालिकेतला लुक अनोखा असणार आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे'. 

सध्या मालिकेमध्ये नवीव ट्विस्ट आला आहे. अक्षरा आणि महादेव या काका-पुतणीची भेट तर झाली आहे. मात्र आजच्या भागामध्ये महादेव काकांचा नक्की मृत्यु झाला आहे की ते एक रहस्य आहे हे समजणार आहे. अक्षरासमोर आता एक नवीन आव्हान समोर आलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com