
लंडनमध्ये प्रवीण तरडेचा मराठी दणका, म्हणाला, इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे..
pravin tarde : लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री अशी बहू ख्याती असलेले प्रवीण तरडे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. त्याच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे 'मुळशी पॅटर्न' असो 'धर्मवीर' किंवा 'हंबीरराव' प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी तो भरभरून बोलत असतो. आता तर त्याने थेट लंडनमध्ये मराठी मातीचा दणका दाखवला आहे. यासंदर्भात माहिती देणारा एक खास विडिओ त्याने शेयर केला आहे.
(pravin tarde and his wife snehal tarde at oxford street in london to watch lion king play with wear traditional dress)
'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि लेखन या सगळ्यात प्रवीण गेली काही वर्ष प्रचंड व्यस्त होता. म्हणूनच सध्या तो कामामधून निवांत वेळ काढत आपल्या पत्नीसोबत म्हणजे स्नेहल तरडे सोबत लंडन येथे फिरण्यासाठी गेला आहे. लंडन येथे सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच प्रवीणने एक विडिओ शेयर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो नाटक आणि मराठी पेहराव यावर बोलला आहे.
या व्हिडिओ मध्ये प्रवीण तरडे म्हणतो, 'लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीट येथे आम्ही लायन किंग हे नाटक पाहायला आलो आहे. आता नाटक पाहायला यायचं म्हणजे पारंपरिक पेहराव झालाच पाहिजे. कारण इथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की आपण कुठून आलो आहोत. आणि गजराही हवा. आता लंडन मध्ये आलोय तर नाटकाचा आनंद घेतो, नाटक पाहणं ही आपली संस्कृती आहे. आम्हीही नाटक पहातो तुम्हीही पाहा. नाटक पाहायला हवं, कारण ते तिथल्या सामाजाचं, संस्कृतीचं म्हणणं मांडत असतं. त्यामुळे बघूया इथल्या काळकरांचं काय म्हणणं आहे., पाहून आल्यावर सांगतोच.' या व्हिडीओमध्ये स्नेहल तरडे यांनी नाकात नथ, पारंपरिक साडी, दागिने परिधान केले आहेत. केसात गजरा माळला आहे. तर प्रवीण तरडे यांनी राजमुद्रा प्रिंट असलेलं जॅकेट परिधान केलं आहे.
Web Title: Pravin Tarde And His Wife Snehal Tarde At Oxford Street In London To Watch Lion King Play With Wear Traditional Dress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..