esakal | अभिनेत्री करीना कपूर विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

kareena kapoor

अभिनेत्री करीना कपूर विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

बीड: बीडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. करीनाच्या प्रेग्नंसी बायबल (Pregnancy Bible) या पुस्तकावर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने आक्षेप घेतला आहे. या पुस्तकाच्या शिर्षकात ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र ग्रंथ बायबलचा उल्लेख केल्याने बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत, अशी तक्रार संघटनेने केली आहे. तसेच पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तत्काळ हटवावा अशी मागणीही अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार दिली आहे.

अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. यामध्ये आदिती शहा भीमजानी (Aditi Shah Bhimjani) तसेच प्रकाशकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: Amazon च्या 'प्रोजेक्ट कुइपर'साठी फेसबुकमधील तज्ज्ञांची टीम

ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्याने सर्वांवर कलम आयपीसी कलम 295-A नुसार( IPC section 295-A ) कारवाई करण्याची मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्याचे सांगितले आहे पण अजून गुन्हा दाखल झाला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

loading image