प्रीती झिंटा झाली आई; जुळ्या मुलांची नावं माहितीये? | Preity Zinta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Preity Zinta Gene Goodenough

प्रीती झिंटा झाली आई; जुळ्या मुलांची नावं माहितीये?

अभिनेत्री प्रीती झिंटा Preity Zinta आणि तिचा पती जीन गुडइनफ Gene Goodenough यांच्या घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. प्रीतीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. 'मला आज तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत. आमची मनं कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरली आहेत. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचं कुटुंबात स्वागत केलं आहे', असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं. प्रीतीने या पोस्टमध्ये तिच्या मुलांची नावंसुद्धा सांगितली आहेत. जय आणि जिया अशी दोघांची नावं आहेत. सरोगसीच्या माध्यमातून जुळ्यांचा जन्म झाला आहे.

'आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आम्ही दोघं खूप उत्सुक आणि आनंदी आहोत. या अविश्वसनीय प्रवासात आमची साथ देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मनःपूर्वक आभार,' असं तिने पुढे लिहिलं.

हेही वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत होणार 'या' दिग्गज कलाकाराची एण्ट्री

काही वर्षे डेट केल्यानंतर प्रीती आणि जीन यांनी २०१६ मध्ये लॉस एंजिलिसमध्ये हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. लग्नानंतर प्रीती अमेरिकेला राहायला गेली. कामानिमित्त आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती भारतात येते. प्रीतीने १९९८ मध्ये मणी रत्नम दिग्दर्शित 'दिल से' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने 'कल हो ना हो', 'वीर झारा', 'कभी अलविदा ना कहना', 'क्या कहना', 'संघर्ष', 'दिल चाहता है', 'लक्ष्य' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

loading image
go to top