'आई कुठे काय करते' मालिकेत होणार 'या' दिग्गज कलाकाराची एण्ट्री | Aai Kuthe Kay karte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi serial aai kuthe kay karate Arundhati face new problem

'आई कुठे काय करते' मालिकेत होणार 'या' दिग्गज कलाकाराची एण्ट्री

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एका नवीन भूमिकेची एण्ट्री झाली. अरुंधतीचा मित्र आशुतोष तिच्या आयुष्यात आला आणि कथेला पुन्हा रंजक वळण मिळालं. आता या मालिकेत आणखी एका कलाकाराची एण्ट्री होणार असल्याचं समजतंय. अरुंधती सध्या महिलांसाठी काम करणाऱ्या एका आश्रमात काम करत आहे. या आश्रमाच्या ट्रस्टी म्हणून या नवीन पात्राची एण्ट्री होणार आहे.

अरुंधतीचं गाणं आश्रमाच्या ट्रस्टी सुरेखाताई यांच्या कानी पडतं. या ट्रस्टींची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे साकारणार असल्याचं कळतं. बऱ्याच कालावधीनंतर या छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

हेही वाचा: 'यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही'; निर्मात्याची घोषणा

अरुंधतीने यशच्या मदतीने आणि आप्पांना त्याबद्दलची माहिती देऊन राहतं घर गहाण ठेवलं. अविनाशची कर्जाची नड भागवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं. तसंच समृद्धीमधील तिचा हिस्सा तारण ठेवला. सुरुवातीला या सर्व गोष्टींची माहिती घरात इतर कोणालाच नव्हती. मात्र यश गौरीला ही गोष्ट सांगताना संजना ऐकते. त्यानंतर त्याचा फायदा घेत ती देशमुखांच्या घरात गौप्यस्फोट करते. आता घरातील सदस्यांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत मालिकेत येणारं नवीन पात्र अरुंधतीची कशी मदत करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

loading image
go to top