esakal | प्रिती झिंटा देणार 'गुड न्यूज'? पोलका डॉट ड्रेसमुळे जोरदार चर्चा 
sakal

बोलून बातमी शोधा

preity zinta

काय आहे 'पोलका डॉट' ड्रेसची भानगड?

प्रिती झिंटा देणार 'गुड न्यूज'? पोलका डॉट ड्रेसमुळे जोरदार चर्चा 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

अभिनेत्री अनुष्का शर्माने जेव्हा ती गरोदर असल्याची 'गुड न्यूज' सोशल मीडियावर दिली, तेव्हा तिच्या ड्रेसची खूप चर्चा झाली. अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती पोलका डॉट प्रिंटमधल्या ड्रेसमध्ये दिसली होती. त्यामुळे 'गुड न्यूज' देताना अनुष्काने परिधान केलेला पोलका डॉट फॅशनचा ड्रेस मीम्सचा विषय ठरला. आता त्याच पॅटर्नमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रितीनेही पोलका डॉट प्रिंटचा ड्रेस घातल्याने तीसुद्धा गरोदर आहे की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. काही कामानिमित्त प्रितीने अभिनेता हृतिक रोशनची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. तेथून बाहेर पडताना पापाराझींनी तिचे फोटो क्लिक केले. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रितीकडेही 'गुड न्यूज' आहे का, अशी चर्चा सुरू झाली. 

काय आहे 'पोलका डॉट'ची भानगड?
अभिनेत्री अनुष्काने पोलका डॉट प्रिंट असलेला ड्रेस परिधान करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. योगायोगाने त्यानंतर क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक हिनेसुद्धा पोलका डॉट प्रिंटमधला ड्रेस परिधान करत 'गुड न्यूज' दिली. त्यामुळे पोलका डॉट प्रिंट म्हणजे 'गुड न्यूज' असं मजेशीर समीकरणच नेटकऱ्यांनी तयार केलं. त्यावरून भन्नाट मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

हेही वाचा : अनुष्काने चक्क विराटला उचललं; व्हिडीओ व्हायरल

प्रितीच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस
प्रितीला पोलका डॉट प्रिंटच्या ड्रेसमध्ये पाहताच चाहत्यांनी कमेंट्स करायला सुरुवात केली. प्रितीकडेही आनंदाची बातमी आहे का, असा प्रश्न एकाने विचारला. तर हा गुड न्यूजवाला ड्रेस आहे, असं दुसऱ्याने म्हटलं. काहींनी हृतिक आणि प्रितीला पुन्हा एकदा एकत्र चित्रपटात झळकण्याची इच्छा व्यक्त केली. 'कोई मिल गया' या चित्रपटात प्रिती आणि हृतिकने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

loading image