गोव्यात 'सूर नवा ध्यास नवा'चं शूटिंग पाडलं बंद; सेटवर आमदारांचा गोंधळ

गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई केलं विरोध प्रदर्शन
Vijay Sardesai
Vijay Sardesai

राज्यातील कोरोनाचा वाढता कहर आणि लॉकडाउन पाहता अनेक मालिका आणि रिअॅलिटी शोजनी महाराष्ट्राबाहेर शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. गोव्यातही Goa अनेक मालिका आणि शोजचं शूटिंग सध्या सुरू आहे. कलर्स वाहिनीवरील Colors Marathi 'सूर नव्या ध्यास नवा' Sur Nava Dhyas Nava या लोकप्रिय रिअॅलिटी शोचं शूटिंग सध्या गोव्यात सुरू आहे. मात्र या शूटिंगदरम्यान गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई Vijay Sardesai यांनी सेटवर एकच गोंधळ घातला. गोव्यातील मडगाव इथल्या रवींद्र भवनमध्ये शोचं शूटिंग सुरू होतं. त्याठिकाणी सरदेसाईंनी विरोध प्रदर्शन केलं. शूटिंगमुळेच गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. (president of goa forward party vijay sardesai stopped sur nava dhyas nava shooting)

सेटवर कोव्हिडच्या नियमांचं पालन केलं जात नव्हतं, असाही आरोप सरदेसाईंनी केला. तर दुसरीकडे कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन आणि सर्व नियम पाळत शूटिंग केल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. या वादात अखेर गायक अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केली आणि त्यानंतर हा तणाव निवळला, असं समजतंय.

हेही वाचा : मनाला रिफ्रेश करण्यासाठी पाहा 'या' हलक्या-फुलक्या वेब सीरिज

राज्यात १५ मेपर्यंत कडक लॉकडाउन असल्याने मुंबईत आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या सर्व मालिका आणि शोज यांनी राज्याबाहेर शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वातील अनेकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. यावेळी नुकसानाचा आणखी भार सहन करावा लागू नये म्हणून शूटिंगचे ठिकाण बदलण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com