मोदींच्या मुलाखतीवरुन कपिलनं घेतली अक्षयची फिरकी: व्हायरल व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय कुमार
मोदींच्या मुलाखतीवरुन कपिलनं घेतली अक्षयची फिरकी: व्हायरल व्हिडिओ

मोदींच्या मुलाखतीवरुन कपिलनं घेतली अक्षयची फिरकी: व्हायरल व्हिडिओ

मुंबई - बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (bollywood khiladi akshay kumar) हा त्याच्या हटकेपणासाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी (bollywood celebrity) आहे. सध्या अक्षय कुमारच्या नावाचा बोलबाला आहे. याचे कारण त्याच्या गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. कोरोनाच्या काळात देखील त्याच्या बेलबॉटम (bellbottom) आणि लक्ष्मी बॉम्ब (laxmi bomb) सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता. काही कारणास्तव त्याचा लक्ष्मी बॉम्ब हा वादाच्या भोवऱ्यातही सापडल्याचे दिसून आले होते. आता तो चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मानं त्याची घेतलेली फिरकी. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचं आणि सध्याच्या सरकारमधील नेत्यांशी असलेली जवळीक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

बऱ्याच दिवसांपूर्वी अक्षयनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एक मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यानं मोदींना वेगवेगळे प्रश्न विचारुन त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला होता. ही मुलाखत सोशल मीडियावरही (Social Media) चर्चेत आली होती. त्याचे कारण अक्षयनं त्यांना विचारलेले काही गंमतीशीर प्रश्न. या प्रश्नांवरुन अक्षयला कपिलनं छेडलं आहे. त्याचं झालं असं की, अक्षय आणि अभिनेत्री सारा अली खान या त्यांच्या अतरंगी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं कपिलच्या शो मध्ये आले होते. त्यावेळी नेहमीप्रमाणं कपिलनं आपल्या शैलीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र एका ठिकाणी त्यानं अक्षयला चांगलचं कोड्यात टाकलं. तो प्रश्न मोदींच्या मुलाखतीवरुन विचारला होता. सध्या सोशल मीडियावर ही मुलाखत व्हायरल झाली आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

कपिल अक्षयला विचारतो तुम्ही तर देशाच्या सर्वोच्च नेत्यांना आंबे खाण्याच्या पद्धतीवरुन प्रश्न विचारला होता. त्यावर मी तुम्हाला आणखी काय विचारायचे, त्यावर अक्षय कपिलला म्हणतो की, तुझ्यात हिंमत असेल तर तु त्या व्यक्तिचे नाव घे, हाच प्रश्न अक्षय त्याला दोन वेळा विचारतो. असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या या भांडणात सारा अली खानला हसु आवरत नसल्याचेही आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसून येते.