सम्राट पृथ्वीराज:'तर अक्षय नाही,सनी देओल असता सिनेमात'; दिग्दर्शकाचा खुलासा

३०० करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं १२ दिवसांत ६३.५० करोड रुपये कमावले आहेत.
Prithviraj: Akshay Kumar replaced Sunny Deol in titular role because YRF wanted a more saleable hero
Prithviraj: Akshay Kumar replaced Sunny Deol in titular role because YRF wanted a more saleable heroGoogle

सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj)बॉक्स ऑफिस वर फ्लॉप झाला आहे. ३०० करोड रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं १२ दिवसांत ६३.५० करोड रुपये कमावले आहेत. अक्षय कुमारचा दहा महिन्यात हा तिसरा सिनेमा आहे,जो तिकीट बारीवर सपशेल आपटला आहे. भारताचे शेवटचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाला मिळालेलं अपयश दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदीचं मन मात्र खट्टू करुन गेलं आहे. दिग्दर्शकाला देखील कळत नाहीय की नेमकं सिनेमाला अपयश का मिळालं? त्यानं सिनेमाविषयी आता अनेक खुलासे केले आहेत. एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक म्हणाला आहे की,'' १८ वर्ष आधी सम्राट पृथ्वीराजची कथा सनी देओलसाठी लिहिली होती. तो सिनेमाची स्वतः निर्मिती करणार होता. पण तेव्हा त्याला मार्केटमधून हवा तसा पाठिंबा मिळाला नाही आणि ते स्वप्न अर्धवट राहिलं''(Prithviraj: Akshay Kumar replaced Sunny Deol in titular role because YRF wanted a more saleable hero)

Prithviraj: Akshay Kumar replaced Sunny Deol in titular role because YRF wanted a more saleable hero
'दिलीप कुमार यांना भारतरत्न मिळायला हवा'; सायरा बानो यांची मागणी

'सम्राट पृथ्वीराज' मध्ये अक्षय कुमार सोबत मानुषी छिल्लर,सोनू सूद,संजय दत्त,मानव विज आणि आशुतोष राणा सारख्या दिग्गज अभिनेत्यांनी काम केलं आहे. हा सिनेमा ३ जून रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली. काही ठिकाणी तर थिएटवाल्यांना अक्षरशः प्रेक्षक न आल्यानं शो कॅन्सल करावे लागले. ४ वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळलेल्या चंद्रप्रकाश द्विवेदींच्या मते त्यांच्या सिनेमाशी राजकारण केलं गेलं आहे. ते म्हणाले आहेत,''मला खुप आनंद झाला असता जेव्हा एखाद्या इतिहासकारानं यावर प्रश्न उठवला असता. पण तुम्हाला जर कहाणी ऐकायचीच नाहीय आणि ती न ऐकता तुम्ही तिच्यात दोष काढताय हे चुकीचं आहे''.

Prithviraj: Akshay Kumar replaced Sunny Deol in titular role because YRF wanted a more saleable hero
सिद्धांत कपूरने वापरली आर्यनच्या मित्राची आयडिया, ड्रग केस मध्ये करतोय बचाव

सिनेमाला मिळालेले रिव्ह्यूज आणि रिअॅक्शन संदर्भात बोलताना दिग्दर्शक द्विवेदी म्हणाले की,''प्रेक्षकांची आवड आणि त्यांना नेमकं काय हवंय हे समजण्यात कदाचित मी कमी पडलो. आम्ही सिनेमा बनवला,पण लोकांना तो खटकला. मला अजून पर्यंत कळलं नाही की नेमका प्रॉब्लेम काय आहे. लेखकानं पूर्ण प्रामाणिकपणे त्याचं काम केलं आहे. मूळ इतिहासाशी आम्ही छेडछाड केलेली नाही. पूर्ण जबाबदारीनं आम्ही हे काम केलं आहे''.

Prithviraj: Akshay Kumar replaced Sunny Deol in titular role because YRF wanted a more saleable hero
'चला हवा येऊ द्या' ची साथ सोडणार का भारत गणेशपुरे,सागर कारंडे? कारण चर्चेत

''सिनेमातील कलाकारांच्या कास्टिंगविषयी देखील लोकांना काही गोष्टी पटल्या नव्हत्या. अक्षय कुमारपेक्षा ३० वर्ष छोटी मनुषी छिल्लरला लीड भूमिकेसाठी निवडलेलं देखील लोकांना खटकलं. अशा कितीतरी ऐतिहासिक मालिका जर आपण पाहिल्या तर त्यातील व्यक्तिरेखा कुठे मुळ व्यक्तिरेखांशी जुळणाऱ्या होत्या. भगवान कृष्ण सावळ्या रंगाचे होते, पण आपल्याकडे गोरा कृष्ण देखील दाखवला गेला आहे. पृथ्वीराज कपूर यांनी अकबराची भूमिका केली होती पण ते कुठल्याच अॅंगलने तसे वाटत नव्हते. प्रत्येक दिग्दर्शकही अक्षयला वेगवेगळ्या भूमिकेत त्याच्या नजरेतून पाहतो. तुम्हाला त्याची व्यक्तिरेखा आवडली नाही,ठीक आहे पण त्यासाठी आंदोलन करायचं हे मात्र चुकीचं आहे''.

Prithviraj: Akshay Kumar replaced Sunny Deol in titular role because YRF wanted a more saleable hero
अभिनेत्रीच्या मुलीनं डेटिंग App वर बनवलं आईचं प्रोफाईल; नंतर जे घडलं ते...

'सम्राट पृथ्वीराज'वर सोशल मीडियावर जी टीका झाली त्याविषयी बोलताना चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले की,''जेव्हा कधी एखाद्या हिंदू राजाविषयी बोललं जातं तेव्हा वाद होतो. पण जेव्हा अकबर बोलतो तेव्हा विरोध केला तर ते चुकीचं आहे. अबुल फजल बोलला तर ते योग्य पण चंदबरदाई बोलला की ते चुकीचं कसं? काव्यातून एक कथा मिळाली आणि त्यावर सिनेमा बनला आहे. इतिहासावर वाद घालणं चुकीचं आहे. ज्यांना आपल्या राजकीय हेतू साध्य करायचा आहे त्यांनी त्यासाठी या सिनेमाला वादात ओढू नये''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com