प्रिया बापटची वेबसीरिज 'इथे' पाहायला मिळेल फ्री!

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

'सिटी ऑफ ड्रिम्स' या गाजलेल्या वेबसीरिजनंतर प्रिया बापटची नवी वेब सीरिज आली आहे. 'आणि काय हवं' या नावाची ही वेबसीरिज मॅक्सप्लेअरवर फ्री बघता येईल.

मुंबई : 'सिटी ऑफ ड्रिम्स' या गाजलेल्या वेबसीरिजनंतर प्रिया बापटची नवी वेब सीरिज आली आहे. 'आणि काय हवं' या नावाची ही वेबसीरिज मॅक्सप्लेअरवर फ्री बघता येईल.

बऱ्याच वर्षांनी प्रिया बापट या सीरिजमध्ये नवऱ्याबरोबर एकत्र दिसणार आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट यांची ही सीरिज आजपासूनच सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे ही सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकांना कुठलंही वेगळं शुल्क द्यावं लागणार नाही. प्रियाने स्वतः ही गोष्ट ट्वीट करुन सांगितली आहे.
 

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फॅन्ससाठी ही खूशखबर आहे. सात वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र येऊन रसिकांना छान ट्रीट देणार आहेत. 'आणि काय हवं?' या वेबसीरिजचं दिग्दर्शन वरुण नार्वेकरनं केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priya bapat new web series watch free at MX player

टॅग्स